IMPIMP

‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला- ‘अनेक अभिनेत्रींनी माझं लैंगिक शोषण केलं !’

by sikandershaikh
pak-actor-azfar-rehman

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पाकिस्तानी स्टार अजफर रेहमान (azfar rehman) यानं आता कास्टींग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. काही अभिनेत्रींनी आपलं लैंगिक शोषण केलं असा दावा त्यानं केला आहे. सध्या अजफरच्या या वक्तव्यामुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली असून त्याच्या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एका वृत्तावाहिनीच्या मुलाखतीत बोलताना त्यानं याबाबत भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना अजफर म्हणाला, #MeToo हा खूप गंभीर मुद्दा आहे. कोणत्याही क्षेत्रात लैंगिक शोषण होणं अयोग्य आहे. परंतु काहीजण याचा गैरवापरही करतात. लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती करणं अयोग्य आहे, परंतु सहमतीनं अशा गोष्टी होत असतील तर त्यात अयोग्य काहीच नाही असंही त्यानं सांगितलं.

काहीजण असेही असतात जे सहमतीनं संबंध ठेवतात आणि नंतर शोषण झाल्याचा आरोप करतात. त्यामुळं सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया देणं कठीण असतं असंही त्यानं यावेळी बोलताना नमूद केलं.

पुढं बोलताना आपल्या शोषणाबद्दल सांगताना अजफरनं (azfar rehman) सांगितलं की, अनेक महिला कलाकारांनी माझं लैंगिक शोषण केलं आहे. मी त्यांची नावं जाहीर करणार नाही. मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे. ते आयुष्यातील वाईट अनुभव होते असंही तो म्हणाला.

अजफर म्हणाला, महिलांची समाजातील प्रतिमा आणि त्यांचं स्थान लक्षात घेता पुरुषांकडून होणारे असे
आरोप हसण्यावारी नेले जातात अशी खंत देखील त्यानं व्यक्त केली.
या क्षेत्रात या गोष्टी होत आहेत आणि होतच राहणार आहेत असंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं.

Related Posts