IMPIMP

Zwigato Movie Tax Free | कपिल शर्माच्या ‘झ्विगाटो’ चित्रपटाला ‘या’ राज्याने केला टॅक्स फ्री; दिग्दर्शिकेने ट्वीट करून दिली माहिती

by nagesh
Zwigato Movie Tax Free | kapil sharma starrer zwigato movie made tax free in this state of india

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) हा त्याच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे. त्याला सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ने (The Kapil Sharma Show) कपिलला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. त्याचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपट (Zwigato Movie Tax Free) नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधी बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने काही फारशी कमाई केली नाही मात्र नंतर हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Film critic Taran Adarsh) यांनी चित्रपटाच्या कमाई संदर्भात एक पोस्ट केली होती. या पोस्टनुसार ‘झ्विगाटो’ या चित्रपटाने (Zwigato Movie Tax Free) प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फक्त 43 लाख कमावले होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल या चित्रपटाच्या कमाईत 44.09 टक्क्यांनी वाढ झाली असून या चित्रपटाने 62 लाखांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाला हळूहळू मिळणार प्रतिसाद वाढत आहे. यानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. कपिल शर्मा आणि नंदिता दासचा (Nandita Das) हा चित्रपट ओडिसा सरकारने (Odisha Government) टॅक्स फ्री (Zwigato Movie Tax Free) म्हणजेच करमुक्त केला आहे.

 

 

ओडिसा चे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Odisha Chief Minister Naveen Patnaik) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हि आनंदाची बातमी दिली आहे. एवढेच नाहीतर या राज्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकांनी पुढे यावं ज्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये मदत होईल अशी आशादेखील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्यक्त केली.
नंदिता दास यांनी याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आभार मानले आहेत.
या चित्रपटात कपिलने एका फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे.
तसेच या चित्रपटात कपिल शर्माबरोबर गुल पनाग (Gul Panag), सयानी गुप्ता
(Sayani Gupta) यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दासने केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Zwigato Movie Tax Free | kapil sharma starrer zwigato movie made tax free in this state of india

 

हे देखील वाचा :

Chowk Marathi Movie | गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘चौक’ची तारीख जाहीर, 12 मे ला होणार प्रदर्शित; महाराष्ट्रातल्या चौकाचौकाची गोष्ट

Jalgaon ACB Trap | 5 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी तलाठयासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे खोचक शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले- ‘जशी स्क्रिप्ट आली, तशी…’

 

Related Posts