IMPIMP

Budget 2023 | अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय? जाणून घ्या काय स्वस्त तर काय महाग

by nagesh
Budget 2023 | budget 2023 live updates whats get cheaper what gets costly after fm sitharaman speech mobile tv parts gold silver price

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (FM Nirmala Sitharaman) या आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करत आहेत. यावेळी त्यांनी शेती (Agriculture), उद्योग (Industry), शिक्षण (Education), पायाभूत सुविधा (Infrastructure), रेल्वे (Railways) अशा विविध क्षेत्रांसाठी तरतूदी जाहीर करण्यात आल्या. अर्थसंकल्पातील या घोषणांमुळे त्याचा अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहे. त्यातच मोदी सरकारकडून सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. नव्या कररचनेनुसार सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. हा देशातील करोडो करदात्यांसाठी (Taxpayers) महत्वाचा निर्णय असल्याचे मानले जात आहे. (Budget 2023)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सीमाशुल्क, सेस आणि सरचार्जमध्ये देखील बदल करण्यात आल्याचे जाहीर केले. परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या खेळण्यांवरील सीमा शुल्क १३ टक्क्यांनी घटविण्यात आल्याचे यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या. तसेच लिथिएम बॅटरीवरील सीमाशुल्क देखील घटविण्यात आले आहे. तर सायकल स्वस्त होणार आहेत. (Budget 2023)

 

अर्थसंकल्पातील नव्या धोरणांमुळे त्याचा खालील गोष्टींवर परिणाम होणार असून त्या गोष्टी महाग होणार आहेत :
सोने आणि चांदीची परदेशातून आयात केलेली भांडी
सोने आणि चांदीचे परदेशातून आयात केलेले दागिने
प्लॅटिनमचे दागिने
विदेशी किचन चिमणी
ठराविक ब्रँडसच्या सिगारेट महागणार
छत्री
एक्स रे मशीन
हिरे

 

तर अर्थसंकल्पातील धोरणांमुळे खालील गोष्टींवर त्याचा थेट परिणाम होत खालील वस्तू स्वस्त होणार आहेत :
मोबाईल फोन
टीव्हीचे सुटे भाग
इलेक्ट्रिक कार
लिथियम आयर्न बॅटरी
परदेशातून आयात होणारी खेळणी
सायकल
बायोगॅस संबंधी उपकरणे
एलईडी टीव्ही
मोबाईल कॅमेरा लेन्स
हिऱ्यांचे दागिने
कपडे

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प असून त्यातून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
दुसरीकडे जगात जागतीक मंदीबाबत चर्चा सुरू असतानाच भारताच्या अर्थसंकल्पाकडे सर्व देशांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे विविध अंगांनी हा अर्थसंकल्प महत्वाचा ठरणार आहे.

 

Web Title :- Budget 2023 | budget 2023 live updates whats get cheaper what gets costly after fm sitharaman speech mobile tv parts gold silver price

 

हे देखील वाचा :

Nagpur Crime | नागपूरात पोटच्या मुलीवर सतत 3 वर्ष अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला पंधरा वर्षे कारावास

Pune Pimpri Crime News | तडीपार गुन्हेगाराला पिस्टलसह पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक

Nandurbar Police | वर्दीतील देवमाणूस – म्हसावद पोलिसांचा मनोरुग्ण महिलेला मदतीचा हाथ, वर्दीनं घडवली कुटुंबासोबत भेट

 

Related Posts