IMPIMP

Pension | आता एकाच व्यक्तीला मिळू शकतो दोन पेन्शनचा लाभ, जारी झाले नवीन नियम; जाणून घ्या

by nagesh
Business Idea | business idea start laptop mobile repair business earn god income know how to start

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pension | आता कुटुंबात एकच व्यक्ती केंद्र सरकारच्या (central government) दोन पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. जर एखाद्या कुटुंबात दोन लोक केंद्रीय कर्मचारी असतील तर हा नियम शक्य आहे. जर एखाद्या मुलाचे आई आणि वडिल दोघे सरकारी कर्मचारी असतील तर दोन पेन्शनचा (Pension) लाभ मिळू शकतो.

याबाबत सविस्तर माहिती पेन्शन आणि पेन्शनर्स वेल्फेयर विभागाने जारी केली आहे. मात्र, दोन पेन्शनच्या नियमात काही अटी ठेवण्यात आल्या आहेत ज्या पूर्ण केल्यानंतर दोन-दोन पेन्शनचा लाभ घेतला जाऊ शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तर मुलांना आणि आई-वडिलांना पेन्शन

पेन्शन विभागाने म्हटले की, जर पती आणि पत्नी सरकारी नोकर आहेत आणि त्यांच्यापैकी कुणी नोकरीच्या दरम्यान किंवा रिटायर्मेंटनंतर मरण पावल्यास, फॅमिली पेन्शनचा लाभ जिवंत असलेल्या पती किंवा पत्नीला मिळेल. जर दोघांचा मृत्यू झाला तर मुलांना आणि आई-वडिलांना पेन्शन मिळेल. पेन्शन विभागाने ‘पेन्शन संबंधीत 75 मुख्य नियम’ नावाने एक सिरिज सुरू केली आहे. या सिरिजद्वारे पेन्शनधारकांना जागरूक केले आहे.

 

काय म्हटले पेन्शन विभागाने

एखादी विधवा किंवा घटस्फोटीत मुलीला सुद्धा फॅमिली पेन्शनचा लाभ मिळतो का, जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू आणि पतीपासून घटस्फोट आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर झाला असेल. या प्रश्नावर पेन्शन विभागाने म्हटले आहे की, फॅमिली पेन्शनचा लाभ एखादी विधवा किंवा घटस्फोटीत मुलीला तेव्हा मिळेल जेव्हा पतीशी घटस्फोट आई-वडिल जिवित असताना झाला असेल.

 

 घटस्फोटीत मुलीला या दिवसांपासून मिळेल लाभ

जर सरकारी कर्मचार्‍याची अवलंबित मुलगी घटस्फोटीत आहे तर फॅमिली पेन्शनचा लाभ तेव्हा मिळेल जेव्हा घटस्फोटाची केस एखाद्या कम्पिटेंट कोर्टात सुरू असेल. ही केस कर्मचारी किंवा पेन्शर जिवंत असतना सुरू झालेली असावी, परंतु घटस्फोट त्यांच्या मृत्यूनंतर जरी मिळाला असेल तरी नियम लागू होतो. या स्थितीत फॅमिली पेन्शन घटस्फोटाच्या दिवसापासून मोजली जाईल.

 

मुलीबाबत काय आहे नियम

अविवाहित मुलीने फॅमिली पेन्शनसाठी क्लेम करण्यासाठी कोणताही कालावधी ठरवलेला नाही. अविवाहित मुलीला तोपर्यंत फॅमिली पेन्शनचा लाभ मिळू शकतो, जोपर्यंत तिचा विवाह झालेला नाही. जर मुलगी विधवा असेल किंवा घटस्फोटीत असेल तरी पुन्हा विवाह होईपर्यंत फॅमिली पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

 

दिव्यांग मुलांसाठी लवकरच निर्णय

जर मुलगी अविवाहित असेल तर जोपर्यंत रोजगार करत नाही तोपर्यंत तिला फॅमिली पेन्शनचा लाभ
मिळू शकतो. दिव्यांग मुलांसाठी सुद्धा सरकार फॅमिली पेन्शनसाठी मोठी निर्णय घेऊ शकते.

 

Web Title : Pension | child eligible for family pension in respect of both parents if they both were government servants

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सायबर चोरट्यांनी Lombard जनरल इन्शुरन्स कंपनीला केले ‘टार्गेट’; कंपनीतून बोलत असल्याचे सांगून देशभरात अनेकांची केली फसवणूक

Taliban | तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात-निर्यातीवर घातली बंदी

Bhosari Plot Scam Case | भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण; मंदाकिनी खडसे ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

UIDAI ने जारी केला विशेष अलर्ट! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? ‘ही’ आहे चेक करण्याची पद्धत

 

Related Posts