IMPIMP

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

by nagesh
SEBI | sebi bars bombay dyeing ness wadia others from securities market for up to 2 yrs imposes rs 15-75 cr fines

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSEBI | जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल आणि भरपूर कमाई करण्याची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण, बाजार नियामक सेबी (SEBI) ने 28 कंपन्यांना त्यांचा आयपीओ आणण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. या कंपन्या बाजारातून एकूण 45,000 कोटी रुपये उभे करण्याचा विचार करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या कंपन्या सादर करतील आयपीओ

PTI च्या म्हणण्यानुसार, बाजार नियामकाने 28 कंपन्यांना 2022-23 या आर्थिक वर्षात एप्रिल-जुलै दरम्यान त्यांची इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आयपीओ (IPO) आणण्यासाठी मान्यता दिली आहे. ज्या कंपन्यांना SEBI ने आयपीओ आणण्यासाठी NOD दिली आहे. त्यामध्ये लाईफस्टाईल रिटेल ब्रँड फॅबइंडिया (FabIndia), भारत एफआयएच (Bharat FIH) आणि टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स (TVS Supply Chain Solutions) सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

 

तारखांचा केला नाही खुलासा

आयपीओ आणून गुंतवणूकदारांना मालामाल करण्याच्या तयारीत असलेल्या इतर मोठ्या कंपन्यांबद्दल बोलायचे तर, यामध्ये ब्लॅकस्टोन आधारित आधार हाऊसिंग फायनान्स (Aadhar Housing Finance) आणि मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स आणि किड्स क्लिनिक इंडिया (Macleods Pharmaceuticals and Kids Clinic India) यांचा समावेश आहे. मात्र, या कंपन्यांकडून अद्याप आयपीओ आणण्याच्या तारखेबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

 

योग्य वेळेच्या प्रतिक्षेत कंपन्या

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे गुंतवणूक धोरणतज्ज्ञ व्ही. के. विजयकुमार म्हणाले की, पेटीएम, झोमॅटो आणि एलआयसी सारख्या कंपन्यांच्या आयपीओमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसला आहे. यानंतर गुंतवणूकदार कमाईच्या चांगल्या संधी शोधत आहेत. तसेच, कंपन्याही आपली पावले पुढे टाकत आहेत. दुसरीकडे, प्रशांत राव, संचालक, आनंद राठी इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि इक्विटी कॅपिटल मार्केट्सचे प्रमुख म्हणाले की, सध्याचे वातावरण आव्हानात्मक आहे आणि ज्या कंपन्यांना मान्यता आहे त्या आयपीओ लाँच करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

2022 मध्ये आतापर्यंत 11 IPO

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत आलेल्या आयपीओ बद्दल बोलायचे झाले तर एकूण 11 कंपन्यांनी त्यांचे आयपीओ लाँच केले आहेत.
या माध्यमातून कंपन्यांनी बाजारातून 33,254 कोटी रुपये उभे केले आहेत.
याच वर्षी, देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा एलआयसी आयपीओ देखील सादर करण्यात आला.
11 कंपन्यांच्या एकूण कमाईत 20,557 कोटी रुपये एकट्या LIC IPO ने उभे केले होते.
परंतु, या वर्षी एलआयसीसह आलेले बहुतांश आयपीओ गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यांचे नुकसान झाले.

 

Web Title : – SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors

 

हे देखील वाचा :

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

 

Related Posts