IMPIMP

Gulabrao Patil On Eknath Khadse | ‘एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या’ – गुलाबराव पाटील

by nagesh
Gulabrao Patil On Eknath Khadse | take back eknath khadses mla minister gulabrao patil gave the reason

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – Gulabrao Patil On Eknath Khadse | जळगाव सहकारी दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल रविवारी (११ डिसेंबर) लागला. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. २० पैकी १६ जागांवर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जिकंले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी या निवडणुकीला प्रतिष्ठेची निवडणूक बनवली होती. त्यामुळे भाजपसाठी हा विजय विशेष महत्वाचा आहे. विशेष म्हणजे १६ जिंकून आलेल्या भाजप उमेदवारांपैकी ५ उमेदवार राष्ट्रवादी गटातील होते. त्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्ला चढविला आहे. एकनाथ खडसेंचे आमदार पद माघारी घ्यायला हवे, अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली आहे. (Gulabrao Patil On Eknath Khadse)

 

गुलाबराव पाटील म्हणाले, “सहकार क्षेत्रातील निवडणूक थेट पक्षाच्या चिन्हावर होत नाही, तरी पक्षाच्या नेत्यासोबत कार्यकर्त्यांनी राहायला हवं, अशी किमान अपेक्षा असते. किमान विरोधी पक्षाच्या गोटातून तरी त्यांनी निवडणूक लढवायला जायला नको. मात्र, खडसेंचे निकटवर्तीय असलेल्या पाच उमेदवारांनी महाजन यांच्या शेतकरी पॅनलकडून निवडणूक लढवत खडसे यांच्याच सहकार पॅनल विरोधात विजय मिळवला. त्यामुळं खडसेंवर पराभवाची नामुष्की आली.” तसेच, या निवडणुकीमुळे निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांनीच संपवायला काढली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी परत घ्यायला पाहिजे, असा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. (Gulabrao Patil On Eknath Khadse)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ, माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, शामल झाम्रे, प्रदीप निकम, मधुकर राणे इत्यादी प्रमुख नेत्यांनी ऐनवेळी खडसेंच्या महाविकास आघाडीला राम राम ठोकून गिरीश महाजन यांच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनल आणि खडसे यांना मोठा धक्का बसला. त्यात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.

 

Web Title :- Gulabrao Patil On Eknath Khadse | take back eknath khadses mla minister gulabrao patil gave the reason

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | वीजखंडित करण्याच्या बहाण्याने दीड लाखांचा गंडा, पिंपरी मधील घटना

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | ‘सीमा प्रश्न श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात…’ – संजय राऊत

Munmun Dutta | …म्हणून अभिनेत्री मुनमून दत्ता फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅनवर भडकली

Mumbai High Court On Nawab Malik Bail | नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

 

Related Posts