IMPIMP

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | ‘सीमा प्रश्न श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात…’ – संजय राऊत

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut hilarious comment trolls cm eknath shinde being inactive in amruta fadnavis blackmailing case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | गुजरात विधानसभेच्या निकालानंतर भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शप्पथ घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शपथविधी समारंभास उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सीमावादावरुन महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे बोलणे झाल्याची माहिती आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लावला आहे. दोनही मंत्र्यांनी सहज गप्पा मारताना सीमाप्रश्नावर बोलणे केले, त्यामुळे राऊतांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. सीमाप्रश्न एवढा हलका आणि खालच्या दर्जाचा वाटला का, की चालता फिरता सहज गप्पा मारल्यासारखा बोलायला, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. (Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt)

 

सहज शपथविधी कार्यक्रमानंतर चालता चालता बोलायला सीमा प्रश्न इतका खालच्या दर्जाचा वाटला का? तसेच सीमा प्रश्न श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात आटोपला, असा टोला राऊतांनी लावला आहे. रस्ता ही काय सीमाप्रश्न सोडवण्याची जागा आहे का? जाता जाता, चालता चालता, कॉफी शॉपमध्ये, एअरपोर्ट लॉनमध्ये, एअरपोर्टच्या लॉबीत भेटण्याची जागा आहे का? सहज भेटले म्हणून बोलले. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न हा अतिशय गंभीर विषय आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सहज दोन मुख्यमंत्री गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला भेटले आणि गप्पा माराव्यात तसा सीमाप्रश्न हाताळला. सीमाप्रश्न इतका कमी महत्त्वाचा, खालच्या दर्जाचा आहे का? असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत. (Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्रावर हल्ला करत आहेत. महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. धमक्या देत आहेत. आणि तुम्ही सहज चालता चालता भेटत आहात आणि चर्चा करत आहात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी हे बाहेर तरी सांगू नये. ज्या प्रश्नावर लोक गेली 60 वर्षे संघर्ष करत आहेत, लढत आहेत, शहीद होत आहेत, मान-अपमान सहन करत आहेत, तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात आटोपावा? मला या सरकारच्या प्रसिद्धी विभागाचे आश्चर्यच वाटते, असे राऊत यांनी नमूद केले.

 

Web Title :- Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | sanjay raut criticize cm eknath shinde dcm devendra fadnavis over border issue

 

हे देखील वाचा :

Munmun Dutta | …म्हणून अभिनेत्री मुनमून दत्ता फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅनवर भडकली

IND vs BAN Test | भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ ‘हा’ खेळाडू होऊ शकतो संघाबाहेर

Mumbai High Court On Nawab Malik Bail | नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

 

 

Related Posts