IMPIMP

Beed : बीड-परळी रोडवर ट्रकची विविध वाहनांना धडक, 5 ठार तर आठ जखमी

by bali123
truck

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन – बीड-परळी रोडवर मोची पिंपळगाव परिसरात सरकी वाहून नेणा-या ट्रक ( truck ) ने रिक्षाला दिलेल्या धडकेत पाच ठार झाले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. ट्रकचालकाने तेथून पळ काढला. त्यानंतर बीड ते वडवणी रोडवरील घोडका राजुरीनजीक एक दुचाकी आणि मालवाहू रिक्षाला धडक देत ट्रक उलटला. दरम्यान, घटनास्थळावरून चालक फरार झाला असून, अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी सरकी वाहून नेणारा भरधाव ट्रक (क्र. एमएच ०९ सीव्ही ९६४४) ने मोची पिंपळगावजवळ एका प्रवासी रिक्षाला (क्र. एमएच २३-५६९४) जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पाच जण जागीच ठार झाले. ट्रकचालकाने ट्रकसह येथून पळ काढला. त्यानंतर तालुक्यातील घोडका राजुरीजवळ एका दुचाकी (क्र.एमएच २३ व्ही ३२१६) ला धडक दिली. यात चालक गंभीर जखमी झाला. त्याचबरोबर लाकडं वाहून नेणाऱ्या एका मालवाहू रिक्षाला (एमएच २० एजी १२६३) जोराची धडक दिली. यात ३ जण जखमी झाले. त्यानंतर काही अंतरावर ट्रकही उलटला. चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. रुग्णवाहिका व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमी व मृतांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत. दोघांना औरंगाबादला उपचारासाठी पाठविले आहे.

Related Posts