IMPIMP

Abu Azmi | समाजवादी पक्षाचे अबू आझमी अमरावती दौरा रद्द करून मुंबईला रवाना; घरी आयटी किंवा ईडीचे छापे पडल्याची चर्चा

by nagesh
Abu Azmi | abu azmis house may have been raided

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (SP leader Abu Azmi) हे कालपासून अमरावती दौऱ्यावर होते व त्यांची आज अकोला येथे जाहीर सभा होणार होती. दरम्यान आझमींनी (Abu Azmi) अकोला दौरा रद्द केला असून ते तातडीने मुंबईसाठी (Mumbai) रवाना झाले आहेत. यावर अबु आझमी यांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, मी माझ्या खाजगी व्यापारात अडचण आल्यामुळे मुंबईला निघत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मात्र, त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी इन्कम टॅक्स (Income Tax) आणि ईडीकडून (ED) छापेमारी (Raid) केल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर ते अमरावती दोऱ्यावर असताना त्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे.तरी यावर, माझ्या घरी किंवा कुठेही आयटी किंवा ईडीचे छापे पडले नसल्याचे आझमी म्हणाले परंतु त्यांनी अचानक दौरा रद्द केल्याने शंका व्यक्त करण्यात आली आहे.

 

दरम्यान, भाजपवर (BJP) टीका करताना आझमींनी खळबळजनक व्यक्तव्य केले. ते म्हणाले, ‘देशात नवीन संविधान लिहणे सुरू आहे, तसेच नवीन संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास तयार करणे सुरू आहे.
त्यामुळे जुनी संसद पाडण्याला विरोध केला पाहिजे या विरोधात उभे राहिले पाहिजे.
‘ असे आवाहन आमदार अबू आझमी यांनी केलं. ‘पंतप्रधान मोदी 15 लाख रुपये देणार होते,
दोन करोड नोकऱ्या देणार होते, त्याच काय झालं. देशात बेरोजगारी वाढली आहे आणि देश बरबाद होत आहे.
याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.’ अशी टीका त्यांनी मोदींवर (PM Narendra Modi) केली.
तसेच लव जिहादच्या नावाखाली भाजपचा अतिरेक करत, अमरावतीत अलीकडे भाजपने लव्ह जिहादचे अनेक आरोप केले असल्याचे आझमी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Abu Azmi | abu azmis house may have been raided

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील बुधवार पेठीतील क्रांती चौकात दोन गटांत कोयत्याने मारामारी

Comedian Sunil Grover | सध्या ‘अशी’ आहे डॉ. गुलाटीची अवस्था; रस्त्याच्या कडेला शेंगदाणे विकतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल

Ajit Pawar | “दारू पिता का? असं आपण विचारत नाही…”; अजित पवारांनी सत्तारांना सुनावले

 

Related Posts