IMPIMP

Achanta Sharath Kamal | अंचता शरथ कमल यांना ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण

by nagesh
Achanta Sharath Kamal | achanta sharath kamal receives khel ratna award from president droupadi murmur

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Achanta Sharath Kamal | बुधवारी राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये बुधवारी सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. टेबल टेनिसमधील भारताचा आघाडीचा खेळाडू अंचता शरथ कमलला यावेळी ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे, बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी,
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांच्यासह 25 क्रीडापटूंना ‘अर्जुन’ क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडादिनी होणारा हा कार्यक्रम निवड प्रक्रिया लांबल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पुढे ढकलावा लागला होता. (Achanta Sharath Kamal)

 

टेबल टेनिसमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या शरथ यांचा वयाच्या 40व्या वर्षी खेलरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा कमलचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्य़ा वाजवल्या. अंचता शरथ कमल यांनी कारकिर्दीत राष्ट्रकुल स्पर्धेत 13 पदके, आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन कांस्यपदके मिळविली आहेत. तसेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी तो पात्रता सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘अर्जुन’ पुरस्कारविजेत्या खेळाडूंना अर्जुनाचा कांस्य धातूचा पुतळा, मानपत्र आणि रोख 15 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्य़ात प्रथम खेलरत्न पुरस्काराचे यानंतर द्रोणाचार्य आणि अखेरीस अर्जुन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार सोहळ्य़ास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. (Achanta Sharath Kamal)

 

Web Title :- Achanta Sharath Kamal | achanta sharath kamal receives khel ratna award from president droupadi murmur

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | राष्ट्रवादीने राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले, राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी – राज ठाकरे

Footballer Pele | ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले रुग्णालयात

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला हत्यारासह मुंढवा पोलिसांकडून अटक

 

Related Posts