IMPIMP

Aditya Thackeray | ‘हे सर्व म्हणजे महाराष्ट्राचे खच्चीकरण आणि आर्थिक अलगीकरण करण्याचा प्रयत्न’ – आदित्य ठाकरे

by nagesh
Aditya Thackeray | 'All this is an attempt to gentrify and economically isolate Maharashtra' - Aditya Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – आज प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर मंत्री शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे उपस्थित होते. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी एक विधान केले, ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापले आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली आहे. मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावर युवासेनेचे अध्यक्ष आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “महाराष्ट्र ज्यांना गद्दार म्हणून ओळखतो, महाराष्ट्र ज्यांना खोके सरकार म्हणून ओळखतो, त्यांच्यासोबत महाराजांची तुलना करणं, हा काही चुकून आलेला शब्द नाही. हे पूर्णपणे नियोजित आहे. महाराष्ट्राचं खच्चीकरण करणं, हे या सरकारचं आणि पक्षाचं नियोजन दिसतंय.” महाराष्ट्र राज्याचे खच्चीकरण करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

 

या वक्तव्याला आदित्य ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. हा संपूर्ण प्रकार म्हणजे भाजपचा एक कलमी कार्यक्रम आहे, असे सांगत ठाकरे म्हणतात, “राज्यपाल जे बोलतात तेच हे मंत्री आज बोलले आहेत. ही सगळी वस्तुस्थिती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? हा महाराजांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे. हे मंत्री मुंबईची reality (वास्तव) ओळखणारे नाहीत, तर मुंबईची realty (स्थावर मालमत्ता) ओळखणारे आहेत. आवाज नक्की कोणाचा आहे हे नक्की ओळखून घ्या. पक्षाचा एक कलमी कार्यक्रम झालेला आहे.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

घडणाऱ्या सर्व घटना या एक नियोजित कटकारस्थान असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणतात.
त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून पळून चाललेले उद्योग, कर्नाटकाने अचानक बाहेर काढलेला सीमावाद,
केंद्रीय तसेच स्थानिक नेत्यांची महाराष्ट्राच्या अस्मितेवर होणारी विधाने यांचे उदाहरण दिले.
ज्याप्रमाणे गुजरात निवडणुकी आधी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले, त्याप्रमाणे कर्नाटकाची निवडणूक
जवळ आल्यामुळे महाराष्ट्रातील गावे कर्नाटकाला जातील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
यातून महाराष्ट्राचे आर्थिक अलगीकरण आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,
असा आरोप त्यांनी केला.

 

 

Web Title :- Aditya Thackeray | ‘All this is an attempt to gentrify and economically isolate Maharashtra’ – Aditya Thackeray

 

हे देखील वाचा :

Shraddha Walkar Murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताबच्या नव्या प्रेयसीची ‘एन्ट्री’

Pune Crime | मित्रांच्या पार्टीत नशेत असलेल्या कॉलेज तरुणीवर बलात्कार, वारजे परिसरातील धक्कादायक घटना

Chandrakant Patil | ‘संजय राऊत घाण, त्यांच्यामुळे 50 लोक पक्षातून निघून गेले’ – आ. चंद्रकांत पाटील

Ahmednagar ACB Trap | नवीन मीटर बसवण्यासाठी लाच मागणारा वायरमन अटकेत; राजुरी तालुक्यातील प्रकार

 

Related Posts