IMPIMP

Ajit Pawar | ‘ …तर आमदारांच्या घरांबाबतचा निर्णय मागे घेतला जाईल’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar on coronavirus in pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारांसाठी केलेल्या घरांच्या घोषणेवरुन संपुर्ण राज्यात गदारोळ माजला. या मुद्द्यावरुन विरोधकांनीही सरकारवर टीका केली. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदारांच्या घरांच्या घोषणेबाबत गैरसमज झाला. ती घरं मोफत दिली जाणार नाहीत. ज्या आमदारांची मुंबईत (MLAs’ Home In Mumbai) घरं नाहीत, त्याच आमदारांना या योजनेचा लाभ होणार असल्याचं,’ अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार म्हणाले (Ajit Pawar) की, “त्या घोषणेबाबत चुकीचा मेसेज गेला. ती घरं मोफत दिली जाणार नाहीत. जसं म्हाडाकडून वेगवेगळ्या कोट्यातील लोकांना घरं दिली जातात. त्यातून आमदारांना घरं दिली जाणार आहेत. ज्या आमदारांची मुंबईत घरं नाहीत, त्याच आमदारांना या योजनेचा लाभ होणार आहे.’ तसेच, ”आमदारांच्या घरांबाबत कारण नसताना गैरसमज होत असतील, तर तो निर्णय थांबवलाही जातो. कदाचित तसाही विचार. कदाचितच, मी खात्री देऊ शकत नाही. तसाही विचार केला जाईल. पण ही घरं मोफत नाहीत. त्यांची ठरवलेल्या किमतींतच घरे देण्याचा विचार होता. पण एवढा विरोध होत असेल, तर ते होणार नाही.”

 

”आमदारांच्या घरांबाबतची घोषणा झाली. ती गैरसमजुतीने झाली.
आमच्या गृहमंत्र्यांनी सांगताना 300 घरं आमदारांना देणार असं सांगितलं. जनतेला वाटलं की, ती घरं मोफत देणार.
वास्तविक तो मोफतचा प्रश्नच नव्हता. म्हाडाची घरं देताना लकी – ड्रॉ काढून आपण ती लोकांना देत असतो.
पण पूर्वीच्या काळात एक अधिकार मुख्यमंत्र्यांना असायचा की, 10 टक्के घरे तातडीची गरज असणाऱ्यांना दिली जायची. त्यात लोकप्रतिनिधी, पत्रकार, खेळाडू अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा समावेश असायचा. कालांतरानं ही योजना बंद केली गेली. पण आता म्हाडामार्फत काही टक्के लोकांना देण्याचा अधिकार आहे. पण याबाबत खूपच चर्चा रंगल्या.” असं अजित पवार म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, लोकांच्या घरांचा प्रश्न आणि लोकप्रतिनिधी यांच्या घराचाही प्रश्न आहे.
आमदारांना घरंही मिळणार आहेत. आमदारांसाठी 300 घरे बांधणार आहोत, सर्वपक्षीय आमदारांना घरं आवश्यक आहेत,
आमदारांनाही चांगल्या घरांची गरज, कायमस्वरुपी घरं देणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar press conference on 300 houses for mlas may decision regarding mlas houses will be withdraw says ajit pawar

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Rate Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

PMC Property Tax | झटपट आकारणी आणि वसुली ! पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने वसूल केले 16 कोटी रुपये

Chitra Wagh | ‘महाराष्ट्र पोलीस अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ पण, सत्ताधाऱ्यांनी त्यांना वसुलीतून मोकळीक दिली तर ना’

 

Related Posts