IMPIMP

Ajit Pawar | राजन विचारेंच्या जीवाला धोका, पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रावर अजित पवार म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar reaction on rajan vichare letter to dgp maharashtra on security issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGI) पाठविलेल्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सर्वच स्तरांतून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. आता विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची (State Government) असून, राजन विचारेंच्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

सरकारे येत जात असतात. लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसाधारण व्यक्ती असो, प्रत्येकाचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीच्या पत्राची दखल घ्यावी, अशी मी विरोधी पक्षनेता या नात्याने मागणी करतो. केवळ राजन विचारे नाही, तर इतर कोणालाही शंका असेल, मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, राज्य सरकारने त्याकडे लक्ष घातले पाहिजे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray group) ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र त्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीस शेठ (DGP Rajnish Seth) यांना पाठविले.
त्यात त्यांनी माझ्या जीवाला धोका आहे, असे सांगितले. तसेच माझी सुरक्षा देखील कमी करण्यात आली आहे.
भविष्यात माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले, तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जबाबदार असतील, असे देखील म्हंटले आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar reaction on rajan vichare letter to dgp maharashtra on security issue

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली? हार्दिक पंड्याने सांगितले कारण

Pune Crime | भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

Rohit Pawar | पवार कुटुंबात देखील फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव, आ. रोहीत पवारांचा मोठा दावा

Andhari by-Election | दिवाळीच्या तोंडावर चांगले वातावरण…कशाला उगाच…, भाजपाने माघार घेतल्याने टीका करणार्‍यांना अजित पवारांनी सुनावलं

 

Related Posts