IMPIMP

Ajit Pawar In Pune | अजित पवारांनी ‘विकासाच्या’ मुद्द्याला हात घालत आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची दिशा केली स्पष्ट

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 cm eknath shinde reply opposition leader ajit pawar over maharashtra karnataka border issue

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनAjit Pawar In Pune | उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय टीका टिपण्णी टाळून ‘विकासाच्या’ मुद्द्याला हात घालत आगामी महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Elections 2022) प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मागील पाच वर्षातील विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Ajit Pawar In Pune)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नागरिकांच्या रस्ते, पाणी, ड्रेनेज, प्राथमिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक यासारख्या मूलभूत गरजा महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात.
विशेष असे की साक्षरता आणि सामाजिक भान असलेल्या पुण्यासारख्या शहरात नागरिक अधिक जागरूक असतात.
त्यामुळेच लोकसभा, विधानसभा या सारख्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकी मध्ये नागरिकांचा प्राधान्यक्रम हा दैनंदिन सुविधांना अधिक राहतो. (Ajit Pawar In Pune)

 

मागील 30 वर्षांत प्रामुख्याने जागतिकीकरण आणि संगणक युगानंतर नागरी सुविधांचा ट्रेंड हा बदलत गेला आहे.
औद्योगिक नगरी पुण्याची भरभराट खऱ्या अर्थाने त्यानंतर झाली.
मागील तीस वर्षात ज्या वेगाने पुण्यातील शहरीकरण आणि सीमा वाढल्या त्यातुलनेत पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रत्येक सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान राहिले आहे.
पूण्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील मोठ्या शहरांमध्ये ही परिस्थिती कमी अधिक फरकाने सातत्याने पाहायला मिळत असते.
परंतु यानंतरही केंद्र आणि राज्यातील सत्तेचा वापर करून प्रत्येक शहरात सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.
परंतु यानंतरही कालानुरूप बदलत्या सुविधांच्या अपेक्षांचे ओझे हे कायमच राहिले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरांच्या विकासाची उदाहरणे द्यायची झाल्यास पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
प्रामुख्याने रस्त्यांचा दर्जेदार विकास, कचरा व्यवस्थापन व नवी मुंबईचा सुनियोजित विकास ही उदाहरणे कायम दिली जातात.
2017 पूर्वी पर्यंत दहा वर्षे पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई या महापालिकांमध्ये साधारण दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता होती.
त्याअगोदर काँग्रेस सत्तेत होती. तर मागील पाच वर्षात भाजपने एकहाती सत्ता मिळवली.

 

केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवलेल्या भाजप ला 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी मध्ये पुणे , पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यामध्ये 2014 प्रमाणे अभूतपूर्व यश मिळाले नाही.
या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस ने पुनरागमन केले. याला शरद पवार आणि धडाकेबाज निर्णय घेणारे आणि विकासाचा झपाटा असलेले अजित पवार यांचे नेतृत्व कारणीभूत ठरले.
भाजपने पवार कुटुंबियांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतरही जनतेने दोन सत्तांमधील फरक अधोरेखित करत राष्ट्रवादीच्या पारड्यात झुकते माप टाकले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यामुळेच सध्या विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडी सरकार आणि पुण्यात विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियावर आरोपांच्या फैरी सुरू केल्या असल्या तरी अजित पवार यांनी त्याला प्रत्युत्तर देणे टाळले आहे.
कोरोना काळात सातत्याने आढावा बैठका आणि महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन महत्वाची भुमिका पार पाडली.
महापालिकेकडून येणारे प्रस्ताव विनाविलंब मंजूर केले.
राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये न रमता विकासात्मक आणि रचनात्मक कामांवर अधिक भर दिला आहे, हाच टेम्पो अजित पवार पुढे घेऊन चालले आहेत,
हे रविवारी त्यांनी शहरात विविध ठिकाणी झालेल्या 30 कार्यक्रमांमध्ये प्रकर्षाने दिसून आले.

 

अगदी सकाळी 7 वाजता सुस म्हाळुंगे येथील विकास कामाच्या उद्घाटनापासून वारजे, आंबेगाव, सुखसागरनगर, कोंढवा, वानवडी, हडपसर, खराडी, धानोरी, रात्री नऊ वाजेपर्यंत विश्रांतवाडी येथील विकासकामांचे उदघाटनाचे 30 कार्यक्रम केले.
नियोजनामध्ये भाषणाचा कार्यक्रम धानोरीतील एक सभा वगळून कुठेच नव्हते. परंतु प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी नगरसेवकांनी सभेची व्यवस्था केली होती.
त्याठिकाणी अजित पवार यांनी आवर्जून छोटेखानी भाषण करताना विकासाचा मुद्दाच केंद्रस्थानी होता.
विरोधी पक्ष भाजपवर टिकाटिपण्णी केली नाही.
यातूनच अजित पवार यांनी आगामी निवडणुकीसाठीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP) दिशा स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे.

 

 

Web Title :- Ajit Pawar In Pune | Ajit Pawar touched on the issue of development and directed the campaign for the forthcoming pune municipal elections

 

हे देखील वाचा :

Aamir Khan | बॉलिवूड अभिनेता अमिर खानने व्यक्त केली ‘ही’ खंत, म्हणाला…

Pune Crime | पहिल्या पतीपासूनच्या मुलांना पैसे पाठविण्याच्या कारणावरुन पत्नीचा डोक्यात दगड घालून खून; लोणी काळभोर परिसरातील घटना

Pune Crime | येरवड्यात तडीपार गुंडाकडून घरात घुसून 21 वर्षीय तरूणीचा विनयभंग; पिडीतेच्या आईला अश्लिल भाषेत शिवीगाळ

 

Related Posts