IMPIMP

Ajit Pawar | अजित पवार सरकारी विमानाने तातडीने मुंबईत दाखल, ‘हे’ प्रमुख कारण

by nagesh
Ajit Pawar | this is not the culture of maharashtra this should not happen in the legislature ncp leader ajit pawar rahul gandhi protest

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे. त्यातच काल अचानक विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मुंबईला जायला लागले. पण त्यांना मुंबईला जाण्यासाठी सरकारी विमानाने जा असा सल्ला देत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच विमान उपलब्ध करून दिल्याचे समजते. तसेच ते का तातडीने मुंबईला गेले याबाबतचा खुलासा देखील त्यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवारांचे (Ajit Pawar) मुंबईत दाखल होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल (दि.२७ डिसेंबर) रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ऑर्थर रोड तुरूंगातून आज (बुधवारी) त्यांची सुटका होणार आहे. त्याच अनुशंगाने त्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार हे मुंबईला आल्याचे त्यांनी सांगितले.

 

शासनाचे विमान कोणी वापरावे याबाबतचा सर्वस्वी अधिकार राज्यांच्या प्रमुखांचा : अजितदादा.

अजितदादांनी (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारने त्यांना सरकारी विमान का उपलब्ध करून दिले यावर देखील यावेळी बोलताना प्रकाश टाकला. अजित पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची आज सुटका होणार आहे. त्यांना मुंबईबाहेर कुठेही जाता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगलीहून मुंबईत येण्यास सांगितलं आहे. माझा देखील मुंबईला जाण्याचा प्रयत्न आहे.’

 

याबाबत पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, हे सगळं होत असताना काल मला शिंदे साहेबांनी उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक घेत असल्याचं सांगितलं.
उद्याऐवजी परवा बैठक घेतली तर बरं पडेल, असं मी त्यांना म्हटलं. कारण मी अकरा वाजताच निघणार होतो.
तर त्यांनी सांगितलं की दहा वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक लावतो.
तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करुन देतो. त्यातून तुम्ही जा आणि काय काम आहे ते करुन परत या.
त्यामुळे मी माझा कार्यक्रम बदलला.
दिलीप वळसे पाटील आणि मी दुपारी एक वाजता शासनाच्या विमानाने मुंबईला जाणार आहोत.
शासनाचं विमान कोणी वापरावं हा सर्वस्वी अधिकार हा राज्याच्या प्रमुखांचा असतो.
मी(Ajit Pawar) पण विरोधी पक्षनेता आहे. मलाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे.
आम्ही देखील सत्तेत असताना कधी काही प्रसंग आला तर एकमेकांना सहकार्य करायचो.
त्यामुळे कदाचित मी दुपारी एक वाजता शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या विमानाने मुंबईत जाण्याचं आणि
त्याच विमानाने परत येण्याचं माझं नियोजन आहे.’

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुमारे १ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची ऑर्थर रोड कारागृहातून सुटका
होणार आहे. त्यांच्या जामीनाची स्थगिती वाढविण्यासाठीची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून
लावली होती. त्यानंतर त्यांची आज ऑर्थर रोड कारागृहातून सुटका होणार आहे.

 

 

Web Title :- Ajit Pawar | opposition leader ajit pawar told the reason why shinde fadnavis govt arrange government plane to come to mumbai immediately

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकानेच घातला गंडा

Pune Crime | मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर गोळीबार; भावाने केलेल्या खूनाचा बदला घेण्यासाठी केले कृत्य

Ajit Pawar | मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका; म्हणाले, ‘एक देखील…’

 

Related Posts