IMPIMP

Ajit Pawar | आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी ! दोन नेत्यांच्या शाब्दिक संघर्षात अजित पवार म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | ajit pawar reaction on eknath shinde uddhav thackeray shivsena dussehra melawa controversy

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | महाराष्ट्राच्या विधानसभेत अधिवेशन सुरू आहे. दरम्यान सभागृहात अनेक विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधकात वातावरण ढवळून निघतानाही पाहायला मिळते. दरम्यान अनुदान मागण्याच्या चर्चेवरूनही वातावरण रंगलं. नगर जिल्ह्यातील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं हाडवैर काही दडलेलं नाही. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विधानसभेत थोरात आणि विखे पाटील यांच्या संघर्षाची आठवण मंत्री जयंत पाटील यांनी करुन दिली. त्यावेळी तेथील वातावरण काही वेळ बदललं. तर, महसूल विभागाच्या अनुदान मागणीवरील चर्चेला सुरूवात झाली. बाळासाहेब थोरात यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हरकत घेतली. तर, याचवेळी विखे पाटील यांनी भाषणाला सुरवात केली.

 

जयंत पाटील यांनी नेमकी ही संधी साधून विखे पाटील यांना शाब्दिक चिमटा काढला.
विखे आणि थोरात यांचे जिल्ह्यात अंडरस्टॅन्डींग आहे. त्यामुळे थोरात नसले तरी चालतं, असं ते म्हणाले.
यावरून सभागृहात एकच हाशा पिकला. काही वेळानंतर मंत्री बाळासाहेब थोरात सभागृहात दाखल झाले.
त्यावेळीही विखे पाटील यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पाहून दादा, ” 20 हजार कोटींचा महसूल बुडतोय याकडे लक्ष द्या.
आदिवासी जमिनीत गैरव्यवहार झाला. याबाबत चौकशी करा किंवा न्यायालयात जावू असा इशारा दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, त्यानंतर थोरात यांनी ‘विखे पाटील विरोधी पक्षनेते होते. त्यावेळची धार त्यांना आता गवसली, असा टोला दिला.
त्यावर, विखे पाटील यांनीही, आमची धार अजून तुम्ही पाहिली नाही, असा चिमटा काढला.
दरम्यान, विखे पाटील यांनी पुन्हा अजित पवार यांच्याकडे वळत दादा महसूल बुडतोय, लक्ष द्या असे सांगितले.
त्यावर अजित पवार यांनी देखील विखे – थोरात हा वाद तुमच्यातच राहू द्या.
मला यात गुंतवू नका असं म्हटलं. यानंतरही सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

 

Web Title :- Ajit Pawar | understanding first then juggling what exactly happened between these two leaders

 

हे देखील वाचा :

South Actress Without Makeup Look | पडद्यामागं मेकअपविना अशा दिसतात ‘या’ काही प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्र्या, फोटो पाहून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

Parineeti Chopra Red Hot Look | परिनीती चोप्राच्या ‘Red Hot’ लूकनं सोशल मीडियावर लागली आग…

Eknath Khadse | ‘1993 ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला’ – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

 

Related Posts