IMPIMP

Ajit Pawar | ‘एकनाथ शिंदेंनी डेअरींगने करुन दाखवलं ते अजित पवारांना जमलं नाही’, केंद्रीय मंत्र्याचा अजित पवारांना टोला

by nagesh
Ajit Pawar | what ajit pawar could not do eknath shinde has done ramdas athawales

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांसह अधिकाऱ्यांना इशारा दिला. सत्तेचा माज करु नका, जाणीवपूर्वक त्रास देणं बंद करा, आम्ही कधी सत्तेत आलो हे कळणारसुद्धा नाही, असं सूचक इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. तसेच अजित पवारांचे आमच्याकडे स्वागत असल्याचंही ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पत्रकारंनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) विधानावर रामदास आठवले यांना विचारले असता त्यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली. अजित पवारांना पहाटे शपथ घेण्याची सवय आहे. त्यांनी सरकार स्थापन केलं होतं, पण ते त्यांना जमलं नाही. अजित पवारांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) जमलं. त्यांनी डेअरींगने ते करून दाखवले. तरीही अजित पवार इकडे येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, पण हे सरकार कोसळून कोणी सत्तेवर येईल, असं काहीही होणार नाही, असेही आठवले यांनी सांगितले.

 

दरम्यान, अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून (BJP) प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी असं वक्तव्य का केलं, याचं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी अजितदादा आपली सत्ता येईल, असं कार्यकर्त्यांना सांगत आहेत, असा पलटवार फडणवीस यांनी केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले,
अजित पवार यांनी सत्तेत येण्याची स्वप्न आता बघू नये,
मागच्या अडीच वर्षात महाराष्ट्रात मोगलशाही आणि एकतर्फी सरकार चालवलं, अशी टीका त्यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | what ajit pawar could not do eknath shinde has done ramdas athawales

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘ट्रेडमार्क’ (Tread Mark) नियमांचे उल्लंघन करीत 50 लाखांची फसवणूक; तिघांविरूद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा

Rohit Sharma | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम

Solapur Crime | धक्कादायक! सोलापूरमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून; तळे हिप्परगा येथील घटना

Sharad Pawar | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची मोठी घोषणा, लढणार की शिवसेनेला पाठिंबा? केले स्पष्ट

 

Related Posts