IMPIMP

RSS मध्ये मोठा बदल ! भैय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रेय होसबोले, जाणून घ्या नवीन सरकार्यवाह यांच्याबाबत

by pranjalishirish
Akhil Bharatiya Pratinidhi Sabha of RSS elected Dattatreya Hosbole as its ‘Sarkaryavah’

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत आज नव्या सरकार्यवाहांची निवड करण्यात आली. या पदावर भैयाजी जोशी यांच्या जागी आता दत्तात्रय होसबोले Dattatreya Hosbole यांची निवड करण्यात आली आहे. सरकार्यवाह हे संघातील दुसरे महत्वाचे पद मानले जाते. बंगळुरू येथे पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत याबाबतीत निर्णय घेण्यात आला.

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी २००९ पासून या पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांच्या जागी नवीन चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. आधीपासूनच हे पद दत्तात्रय होसबोले Dattatreya Hosbole यांच्याकडे जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती तेव्हा आज अखेर या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संघामध्ये सरसंघचालकांचा निर्णय अंतिम मानला जातो. सध्या मोहन भागवत सरसंघचालक म्हणून कार्यरत आहे. मात्र संघाच्या संविधानानुसार संघाचे सर्वोच्च अधिकारी हे सरसंघचालक नसतात, तर सरकार्यवाह हे असतात. सरसंघचालक हे संघाचे मार्गदर्शक असतात, तर सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात. संघाचा विस्तार, संघाची विविध कार्य इत्यादींवर सरकार्यवाहकांचे लक्ष असते.

संघात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे कार्य अत्यंत महत्वाचे मानले जाते. संघाचे निर्णय घेणारी सर्वोच्च व्यवस्था म्हणून याकडे पाहण्यात येते. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक दरवर्षी घेण्यात येते. या वर्षीची बैठक बंगळुरूमध्ये सुरू आहे. याच बैठकीमध्ये सरकार्यवाह पदासाठी दत्तात्रय होसबोले Dattatreya Hosbole यांची निवड करुन त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ते विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची जागा घेणार आहेत. या बैठकीमध्ये ४५० प्रतिनिधी सामील झाले होते. या बैठकीला संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते.

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

कन्नड, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, तामीळ, मराठी या भाषांसोबतच दत्तात्रेय होसबळे यांचे काही विदेशी भाषांवरही प्रभुत्व आहे. कन्नड मासिक ‘असीमा’चे ते संस्थापक संपादक आहेत. ते एच. दत्तात्रय या नावानेच प्रसिद्ध आहेत. कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्याच्या सोराबा तालुक्यात १ डिसेंबर १९५५ ला दत्तात्रय होसबळे जन्म झाला.
धनंजय मुंडेंची पंकजा मुंडें वर जहरी टीका; म्हणाले – ‘हा तर पळकुटे पणा’

इंग्रजी विषयात त्यांनी एम ए केलं आहे. तेराव्या वर्षी ते संघाचे स्वयंसेवक बनले होते. १९७२ मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कार्यरत होते. ते अखिल भारतीय संघटनेमध्ये मंत्री राहिले. १९७८ मध्ये नागपूर शहर संपर्कप्रमुख म्हणून विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

Aslo Read : 

‘…मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का ?’

मनसुख हिरेन प्रकरणी ATS च्या हाती महत्वाची माहिती, PI सुनील माने यांची चौकशी

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

‘मुंबईत मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती असुरक्षित’, नारायण राणेंनी लिहीलं HM अमित शाहांना ‘लेटर’

महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Related Posts