IMPIMP

Anna Hajare on Shinde-Fadnavis Govt. | सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : शिंदे फडणवीस सरकारने असा निर्णय घेतल्यास पुन्हा आंदोलन, अण्णा हजारे यांचा इशारा

by nagesh
Anna Hajare On Shinde-Fadnavis Govt | anna hajare said eknath shinde and devendra fadnavis government will not gave permission to wine sale in super market

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन – Anna Hajare on Shinde-Fadnavis Govt. | सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसारखा काही निर्णय हे
सरकार घेईल असे वाटत नाही. पण असा निर्णय घेतलाच तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यास हजारे यांनी कडाडून विरोध केला होता.
आता शिंदे आणि फडणवीस यांच्या, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अण्णा हजारे बोलत होते. (
Anna Hajare on Shinde-Fadnavis Govt.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा विषय पुन्हा पुढे आणला आहे. या निर्णयावर लोकांकडून आलेल्या हरकती व सूचनांची मोजदाद करून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यास शेतकर्‍यांचे हितच साधले जाईल, असे म्हटले. मात्र, हालचालींना दारूबंदी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. यावर हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Anna Hajare on Shinde-Fadnavis Govt.)

 

आज सकाळी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले, मॉल संस्कृती ही भारतीय नाही.
ती विदेशी संस्कृती आहे. अशा मॉलमध्ये नशाजन्य पदार्थ विकायला ठेवायचे हे बरोबर नाही.
पूर्वी हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी तो थांबला.
मला शाश्वती आहे, आता राज्यात जे सरकार आले आहे, ते मॉल आणि तेथे दारू विकायला ठेवयचा विचार करणार नाही. जर तसा निर्णय झालाच तर नाइलाजास्तव आमच्या मार्गाने जावे लागेल. पण अजून असा काही निर्णय आलेला नाही. आल्यानंतर पाहू.

 

दरम्यान, महविकास आघाडीच्या सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा भारतीय जनता पक्षाने कडाडून विरोध केला.
महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र करायचे आहे काय? असे तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
त्यावेळी अण्णा हजारे यांनीही हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा दिला होता.
यानंतर सरकारला दखल घ्यावी लागली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Anna Hajare On Shinde-Fadnavis Govt | anna hajare said eknath shinde and devendra fadnavis government will not gave permission to wine sale in super market

 

हे देखील वाचा :

Dasara Melava 2022 | शिंदे गट हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार!

Pune PMC News | मागील 2 वर्षांत 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी सर्वाधीक खोदाई करणार्‍या एल ऍन्ड टी (L&T) कंपनीला पुणे महापालिका प्रशासनाचे अभय?

Supreme Court On TV Channels Debates | वृत्त वाहिन्यांवरील ’डिबेट शो’ द्वेष पसरवण्याचे सर्वात मोठे माध्यम; SC कडून सरकारची कानउघडणी, मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार

 

Related Posts