IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Jalna | 17 हजार रुपये ‘PhonePe’ वर लाच घेताना 2 तलाठी एसीबी पथकाच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Jalna | येथील मंठा तालुक्यातील (Mantha Taluka) दोन तलाठी
(Talathi) लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Jalna) जाळ्यात सापडले आहेत. जालना जिल्ह्यात
वाळूची पकडलेली 6 चाकी गाडी सोडण्यासाठी 2 तलाठ्यांनी फोन-पे वरुन 17 हजारांची लाच घेतली आहे. अक्षय भुरेवाल (Akshay Bhurewal)
(रा.उमखेड ता. मंठा) आणि मंगेश लोखंडे (Mangesh Lokhande) (रा. मंगरुळ ता. मंठा) अशी लाच घेणाऱ्या तलाठ्यांची नावे आहेत. (Jalna Bribe Case)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली आहे. फिर्यादीची वाळूची गाडी या तलाठ्यांच्या पथकांनी पकडली होती. यावेळी तक्रारदारांनी रॉयल्टीची रितसर पावती तलाठ्यांना दाखवली. पण, या पावतीमध्ये खाडाखोड आहे, ही पावती चालणार नाही, असं सांगत तुझ्यावर कारवाई करावी लागेल. नाहीतर 50 हजार रुपये दे, असं म्हणत तलाठ्यांकडून गाडीच्या मालकांकडे लाचेची मागणी करण्यात आली. (Bribe Via PhonePe)

 

या दरम्यान, तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचं ठरलं. त्यानंतर फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Jalna ACB) तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन एसीबी पथकाने सापळा रचला. त्यानंतर दोन तलाठ्यांना 17 हजार रुपये फोन पेवर लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरुन मंठा पोलिसात (Mantha Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Jalna | two talathi were caught taking a bribe of rs 17000 through phonepe in jalna

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण; आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली

LPG Cylinder Price Today 1 June | व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरच्या ग्राहकांना दिलासा नाहीच; जाणून घ्या दर

Pune Crime | आई-बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून, 3 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts