IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Sangli | 25 हजाराची लाच प्रकरणी 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात; सांगली पोलिस दलात खळबळ

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

सांगली :  सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Sangli | एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 25 हजारांची लाच मागणा-या दोन पोलीसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Sangli) रंगेहात पकडले आहे. सांगली जिल्हा पोलीस दलातील जत पोलीस ठाण्यातील (Jath Police Station) गणेश ईश्वरा बागडी (Ganesh Ishwara Bagdi) आणि संभाजी मारुती करांडे (Sambhaji Maruti Karande) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap Sangli) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अपघाताचा गुन्हा दाखल असलेल्या भावाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि या अपघातात जप्त असलेली मोटरसायकल सोडण्यासाठी 2 पोलिसांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. संबंधित तक्रारदार यांच्या भावावर जत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या अपघात प्रकरणी संबंधिताची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात संबंधिताला मदत करण्यासाठी आणि जप्त केलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी गणेश बागडी यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयाची लाच मागितली होती. त्यानंतर संभाजी कारंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. दरम्यान तक्रारदाराच्या माहितीनुसार लाचलुचपतच्या पथकाकडून या दोन पोलिसांना रंगेहात पकडण्यात आले.

 

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Guruv),
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे (DYSP Sujay Ghatge),
पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी (Dattatraya Pujari), पोलीस निरीक्षक विनायक भिलारे (Vinayak Bhilare),
अविनाश सागर (Avinash Sagar), प्रीतम चौगुले (Pritam Chaugule), धनंजय खाडे (Dhananjaya Khade),
संजय सपकाळ (Sanjay Sapkal), रवींद्र धुमाळ (Ravindra Dhumal), भास्कर भोरे (Bhaskar Bhore),
संजय कलकुटगी (Sanjay Kalkutagi), राधिका माने (Radhika Mane) यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Sangli | two policemen held in 25 thousands bribe case sangli crim news acb trap

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह 4 भाजप महिला आमदारांची फसवणूक

Pune Accident News | दुर्दैवी ! लेकीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना हडपसारमध्ये अपघात, बाप लेकीचा जागीच मृत्यू

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts