IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Satara | वीज जोडणीसाठी 12 हजार रुपये लाच घेताना ‘महावितरण’चा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइनशेतीला वीज जोडणीसाठी 12 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारणाऱ्या (Accepting Bribe)
महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला (MSEDCL Junior Engineer) सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB)
Satara) रंगेहात पकडले. शरद ओंकेश्वर ओंकार Sharad Onkeshwar Omkar (वय -46) असे लाच घेणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Satara) ही कारवाई सोमवारी (दि.20) वाठार कॉलनी शाखा
कार्यालयात केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत 52 वर्षीय व्यक्तीने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Satara) तक्रार केली होती. शरद ओंकार (वय-46 सध्या रा.  लोणंद शिरवळ रोड, लोणंद, ता.खंडाळा, मुळ रा. मु. लोणसावळे पो. वायफड, ता. वर्धा जिल्हा वर्धा) हा महावितरण कंपनीच्या वाठार कॉलनी शाखा कार्यालयात (Wathar Colony Branch Office) कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

तक्रारदार यांनी शेतीसाठी नवीन वीज कनेक्शनसाठी (New Power Connection) महावितरणच्या वाठार कॉलनी शाखा कार्यालयात अर्ज केला होता. नवीन कनेक्शन देण्यासाठी शरद ओंकार याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 12 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सातारा एसीबीकडे तक्रार केली. सातारा एसीबीच्या (Satara ACB) पथकाने पडताळणी केली असता शरद ओंकार याने 20 हजार रुपये लाचेची मागणी करुन 12 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने आज (सोमवार) सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 12 हजार रुपये लाच स्वीकारताना शरद ओंकार याला रंगेहात पकडण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सातारा एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुरज घाटगे (Deputy Superintendent of Police Suraj Ghatge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत (Police Inspector Sachin Raut), पोलीस नाईक विनोद राजे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काटकर, चालक पोलीस नाईक मारुती अडागळे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी,
असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Satara | acb trap on mahavitaran junior engineer While taking bribe of Rs 12 thousands satara

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर; मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट – IMD

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

Pune PMC News | पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज ! वारकर्‍यांच्या आरोग्याला महापालिकेचे प्राधान्य; महिला वारकर्‍यांना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप करणार

 

Related Posts