IMPIMP

Arjun Khotkar | शिवसेनेचा ‘अर्जुन’ शिंदे गटात प्रवेश करणार ?

by nagesh
Arjun Khotkar | Gorantyal has the habit of 'holding your own and bending to look at others'; Arjun Khotkar's Reply to Abdul Sattar's Criticism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेचे (Shivsena) जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना शिंदे गटात आणण्यासाठी दिल्लीत खलबतं सुरू आहेत. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी दिल्लीत अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची भेट घेतली. मनधरणी करुन खोतकरांना शिंदे गटात (Shinde Group) आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दिल्लीत असताना खोतकरांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याचे पहायला मिळालं. त्यानंतर खोतकर शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र आपण शिवसेनेतच असल्याचे खोतकरांनी सांगितले.

 

दरम्यान, अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांचा प्रवेश होणार असल्याचे कळतं. खोतकर आणि अब्दुल सत्तार काही वेळापूर्वी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथे त्यांची चर्चा झाली. खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. त्यामुळे त्यांनी जर बंडखोरी केली तर शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ठाकरेंशी बोलून अंतिम निर्णय
मित्र, भाऊ, सहकारी म्हणून निश्चितपणे मी त्यांच्यासोबत यावं अशी अपेक्षा आहे. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम केले आहे.
माझ्यामनात जे काही होते ते मी आधीच सांगितले आहे. आज अब्दुल सत्तार आले त्यांच्याशी बोलणं झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलून मी अंतिम निर्णय घेईन असं अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

 

Web Title : – Arjun Khotkar | shivsena leader arjun khotkar will join cm eknath shinde group abdul sattar meet him delhi

 

हे देखील वाचा :

Diabetes Diet | या 5 डाळी मिळून बनवा डायबिटीजच्या रूग्णासाठी हेल्दी डाएट प्लान

Pune Crime | दुर्दैवी ! स्विमिंग पूल बाहेर येताच ओल्या अंगाचा लाईटच्या खांबाला स्पर्श, लोणावळ्यात 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Pune Crime | ट्रेलर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडणार्‍या 5 जणांना अटक; सराईतांवर खडकी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा

 

Related Posts