IMPIMP

Ashish Shelar On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा, आम्ही ती जागा जिंकू’ – भाजप

by nagesh
Ashish Shelar On Jitendra Awhad | bjp leader ashish shelar responds to jitendra awad resignation announcement and ncps allegations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Ashish Shelar On Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आपल्यावर गेल्या 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून, मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जाहीर केले आहे. त्यावर भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी राजीनामा दिल्यास त्यांची ती जागा आम्ही लढवून जिंकू, असे आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या आरोपांचा संबंध काय? हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंड स्टेशन आले का? विचारण्यासारखे आहे. जर का ते निर्दोष आहेत, तर त्यांनी कायदेशीरपणे त्यांची बाजू लढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) निर्माण केलेल्या संविधानात प्रत्येकाला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा अधिकार आहे. पण ज्यावेळी त्यांना निर्दोष्तव सिद्ध करता येत नसेल, तेव्हा असे प्रकार केले जातात. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याचा काहीही संबंध नाही. त्यांना राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी द्यावा. आम्ही ती जागा लढवून जिंकू, असे यावेळी आशिष शेलार म्हणाले.

 

जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यास पूर्णपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जबाबदार
असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) म्हंटले आहे. त्यावर देखील शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.
शेलार म्हणाले, होय हे खरे आहे. कारण, गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसाला त्याच्यावर कोणी आरोप,
प्रत्यारोप, जबरदस्ती, विनयभंग, दादागिरी आणि मारहाण करू नये म्हणून आदेश दिले आहेत.
केल्यास त्याला कायदेशीर लढाई द्यावी लागेल. त्यामुळे मी गृहमंत्र्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.

 

Web Title :- Ashish Shelar On Jitendra Awhad | bjp leader ashish shelar responds to jitendra awad resignation announcement and ncps allegations

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दौंड-पाटस महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू

Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा – सुप्रिया सुळे

Anjali Damania On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाडांनी विनयभंगाची कोणतीही कृती केलेली नाही’; अंजली दमानिया म्हणाल्या – ‘अत्यंत नीच दर्जाचं राजकारण’

 

Related Posts