IMPIMP

Atul Londhe | ‘फाळणीसाठी काँग्रेस नाहीतर…..’ – अतुल लोंढे

by nagesh
Atul Londhe | 'Congress for partition or else.....' - Atul Londhe

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन  – राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत सावरकरांचा (V. D. Savarkar) विषय काढून नव्या वादाल तोंड फोडले. त्यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप एकवटली आहे. त्यांच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी हिंदू महासभा आणि भाजपने आंदोलन केले आहे. यावर आता काँग्रेस नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. फाळणीसाठी काँग्रेस नाही, तर मुस्लिम लीग, हिंदु महासभा आणि सावरकरांचे विचार जबाबदार आहेत, असे अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रणजित सावरकर Ranjit Savarkar (वि. दा. सावरकरांचे पणतू) यांना हे आता कळून चुकले आहे, की सत्य हे कटू असते. कारण, राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे सिद्ध केले आहे. राहुल गांधी यांनी पुरावे समोर आणल्याने रणजित सावरकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बिथरुन गेले आहेत. सावरकरांनी भारताच्या फाळणीची बीजे रोवली होती. त्यांनी भारताच्या फाळणीला खतपाणी दिले. सावरकरांनी मुस्लिम लीगसोबत बसून बंगालमध्ये सरकार स्थापन केले होते. सावरकरांनी 1942 च्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या ‘चले जाव’ चळवळीला विरोध केला होता. त्यांनी देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या आझाद हिंद सेनेला (Azad Hind Sena) विरोध केला होता. त्यामुळे फाळणीसाठी काँग्रेस (Indian National Congress) नाही, तर मुस्लीम लीग (Muslim League) हिंदू महासभा आणि सावरकरांचे तात्कालीन विचार जबाबदार आहेत, असे यावेळी अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले आहेत.

 

राहुल गांधी यांनी यात्रेतील हिंगोलीच्या सभेत सावरकरांनी लिहिलेला माफीनामा दाखविला.
तसेच सावरकर स्वत:ला इंग्रजांचे सेवक म्हणवून घेत होते. त्यामुळे त्यांना दरमहा पेन्शन देखील मिळत होती.
त्यांनी इंग्रजांच्या विरोधात ब्र काढला नाही. त्यामुळे त्यांना वीर म्हणणे चुकीचे आहे.
ते वीर नव्हते, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळे हा वाद पेटला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Atul Londhe | ‘Congress for partition or else…..’ – Atul Londhe

 

हे देखील वाचा :

Sandipan Bhumre | ‘कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचे अंबादास दानवेंनी येऊन शोधून दाखवावे’ – संदिपान भुमरे

Panvel Crime | फार्म हाऊस जवळ ऑडी गाडीत आढळलेला मृतदेह तळेगाव दाभाडे येथील गुन्हेगाराचा, दोन दिवस मृतदेह गाडीत पडून

Chandrakant Khaire | चंद्रकांत खैरे भाषणाला उभे राहिले आणि लोकांनी खुर्च्या सोडल्या

Dabur Odomos | डाबर ओडोमॉसतर्फे ‘डेंगीमुक्त भारत’ मोहिमेचा प्रारंभ- डेंगी व मलेरियापासून बचावासाठी विशेष जनजागृती मोहीम

 

Related Posts