IMPIMP

Dabur Odomos | डाबर ओडोमॉसतर्फे ‘डेंगीमुक्त भारत’ मोहिमेचा प्रारंभ- डेंगी व मलेरियापासून बचावासाठी विशेष जनजागृती मोहीम

by nagesh
Dabur Odomos | Dabur Odomos Initiates ‘#MakingIndiaDengueFree’ Campaign Spreadsawareness on effective prevention from Dengue & Malaria

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Dabur Odomos | डासांच्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणारे आजार रोखण्यासाठी, हाऊस ऑफ डाबरतर्फे निर्मित भारतातील सर्वात लोकप्रिय मॉस्किटो-रिपेलन्ट (Mosquito-Repellent) उत्पादन ‘ओडोमॉस’तर्फे (Dabur Odomos) आज पुण्यात डेंगीमुक्त भारत (#MakingIndiaDengueFree) या मोहिमेचा प्रारंभ झाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या उपक्रमांतर्गत ओडोमॉस सुमारे २० लाख नागरिकांपर्यंत थेट पोचणार असून त्या नागरिकांना डेंगी व मलेरियाच्या घातक परिणामांची माहिती देऊन, या आजारांपासून आपला बचाव कसा करायचा याबाबत जनजागृती करणार आहे. तसेच, ओडोमाॅस मॉस्किटो रिपेलन्ट क्रिमचे मोफत वाटपही करण्यात येणार आहे.

 

मोहिमेंतर्गत डाबर ओडोमॉसकडून बस थांबे, रेल्वे स्थानके आणि शाळांमध्ये डेंगीपासून बचावाबद्दल जनजागृतीपर माहिती सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ पुण्यात सुरु झाला असून त्यानंतर महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि उत्तर प्रदेश येथील सुमारे ७० शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे.या उपक्रमा अंतर्गत आज खडकी येथील स. वि. स . शाळेत विद्याथ्यांना डॉक्टर सतीश पाथरकर यांनी ,मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप मगर, राजेंद्र राममूर्ती आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

 

 

डाबर इंडिया लिमिटेडच्या ब्रँड मॅनेजर साक्षी प्रसाद म्हणाल्या, “डेंगीसह डासांपासून होणाऱ्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच नागरिकांची मदत करण्यासाठी, ब्रँड म्हणून ओडोमॉसने (Dabur Odomos) नेहमीच पुढाकार घेतला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये डेंगीची रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. अशा आजारांचा प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणून, डेंगीपासून बचावासाठी जनजागृती करण्यासाठी आम्ही हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. डेंगीचा प्रसार होऊ नये यासाठी कोणत्या प्रकारची उपाययोजना करता येईल तसेच सामाजिक पातळीवर आपण कशाप्रकारे शिस्त पाळली पाहिजे याबाबत जनजागृती करण्याची आज गरज आहे. मोहिमेंतर्गत डेंगी व मलेरियाच्या आजारांची माहिती व त्यापासून बचाव कसा करायचा याबद्दल आम्ही नागरिकांमध्ये जागृती करत आहोत.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

डाबर इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ मार्केटिंग व्यवस्थापक (होम केअर) संतोष जयस्वाल म्हणाले,
“डेंगी व मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी बचावात्मक उपाय योजनाच प्रभावी ठरतात.
त्यामुळे ‘डेंगीमुक्त भारत’ या आमच्या मोहिमेंतर्गत डासांच्या प्रादुर्भावामुळे पसरणाऱ्या आजारांविषयी
आणि त्यापासून बचाव कसा करायचा याबाबत आम्ही जनजागृती निर्माण करीत आहोत.
आपला स्वतःचा बचाव करण्यासह आपल्याला लहान मुलांच्या संरक्षणाचाही विचार करणे गरजेचे आहे.
मोकळ्या ठिकाणी खेळतानाच नव्हे तर घराच्या खोलीमध्येही डेंगी, मलेरियापासून त्यांचा बचाव करता आला पाहिजे.
जीवघेण्या आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांपासून संपूर्ण बचाव करणारे ओडोमॉस हे देशातील सर्वात लोकप्रिय
असे उत्पादन आहे. दिवस असो कि रात्र, घराबाहेर असो किंवा घरात, डासांपासून संरक्षणासाठी ओडोमॉस
वापरण्याचा सल्ला आम्ही नेहमीच देतो.”

 

 

Web Title :-Dabur Odomos | Dabur Odomos Initiates ‘#MakingIndiaDengueFree’ Campaign Spreadsawareness on effective prevention from Dengue & Malaria

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार’ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Pune Crime | कोकण ट्रिपमधील ओळखीतून मुलाला मारुन टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार; टिंगरेनगरमधील महिलेची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद

Gold Rate Today | आज सोने-चांदीच्या दरात घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

 

Related Posts