IMPIMP

Bachchu Kadu On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण… – बच्चू कडू

by nagesh
 Bachchu Kadu On Uddhav Thackeray | bachchu kadu uddhav thackeray is a good person eknath shinde government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनBachchu Kadu On Uddhav Thackeray | बंडखोर आमदार आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पाठींबा देणारे काही अपक्ष सध्या शिंदे गटात आहेत. बंडखोरीनंतर, पक्षात कशी वाईट वागणूक मिळत होती, कसा अन्याय झाला, पक्षप्रमुखांच्या आजूबाजूच्या लोकांनी कसा त्रास दिला, अशी कारणे सांगण्याची चढाओढच बंडखोर आमदारांमध्ये लागली आहे. आता मविआ सरकारला पाठींबा देणार आणि आता शिंदे गटात असणारे आमदार बच्चू कडू यांनी देखील एकीकडे उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत दुसरीकडे ठाकरेंच्या आजूबाजूच्या माणसांवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Bachchu Kadu On Uddhav Thackeray)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बच्चू कडू म्हणाले, महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच गेलो होतो. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी शब्दही पाळला. उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही. त्यांचा स्वभाव अतिशय निर्मळ आहे. पण आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरले आहे. ज्या ताकदीने ते मातोश्रीवरून काम करत होते, त्या ताकदीने ते वर्षावरून करू शकले नाहीत. (Bachchu Kadu On Uddhav Thackeray)

 

बच्चू कडू यांनी शिवसेनेतील बंडखोरीबाबत एक मोठा खुलासा यावेळी केला. त्यांनी सांगितले की, मी सूरतला शिंदे गटात सहभागी होण्यासाठी गेलो नव्हतो, तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात समेट होऊ शकते का ? हे पाहाण्यासाठी गेलो होतो. मुंबईहून सुरतला जाण्याआधी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. पण त्यांचा फारसा समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही.

 

ते पुढे म्हणाले, शिंदे आणि ठाकरे यांच्यात समन्वय साधता येईल का ? त्यासाठी आम्ही सूरतला गेलो. पण तोपर्यंत तिथे आमदारांची संख्या 29 – 30 पर्यंत गेली होती. तेव्हा लक्षात आले की तिथे कुणाची समेटाची मानसिकता नव्हती. सत्ता स्थापनेनंतरच तिथून निघण्याची प्रत्येकाची भूमिका होती.

 

शिवसेनेतील बंडखोरीचे समर्थन करताना बच्चू कडू म्हणाले, सगळेच बंडखोरी करतात. बंडखोरी ही प्रत्येकात असली पाहिजे.
बंडखोरीच माणसाला जिवंत ठेवते. गीता संस्कृतमध्ये होती. ती मराठीत करण्याचा उठाव ज्ञानेश्वरांनी केला.
शरद पवारांनी 38 वर्षांत 38 आमदार फोडले आणि तिथे बंडखोरी केली. बंड कोण करत नाही ?

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नव्या सरकारमधील संभाव्य मंत्रिपदाबाबत बच्चू कडू म्हणाले, आम्ही या बंडामागे पद मागत नाही.
आम्हाला बरेच कार्यकर्ते म्हणतात की बजेटचे चांगले पद मिळायला हवे. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम वगैरे.
पण आम्ही म्हटले सामाजिक न्याय विभाग द्या जिथे अपंगांची, दीन – दलितांची सेवा करता येईल.

 

Web Title :- Bachchu Kadu On Uddhav Thackeray | bachchu kadu uddhav thackeray is a good person eknath shinde government

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आई-वडील शाळेत मीटिंगसाठी गेले; मुलीची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Amruta Fadnavis | महाशिवरात्रीला एक गाणे रिलीज झाले, पुढ काय ? अमृता फडणवीस म्हणाल्या…

Shivsena Saamana Editorial | महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस ‘या’ दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना ? शिवसेनेचा घणाघात

 

Related Posts