IMPIMP

Balasaheb Thorat | ‘कर्नाटकात मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री शांत का?’ – बाळासाहेब थोरात

by nagesh
Balasaheb Thorat | how is the chief minister silent when the marathi brothers are being attacked by karnataka balasaheb thorats question

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Balasaheb Thorat | महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पुढील काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मंगळवारी महाराष्ट्रातून गेलेल्या ट्रकवर कन्नड रक्षक वेदिकेच्या लोकांनी दगडफेक केली. या घटनेवर महाराष्ट्रातदेखील पडसाद उमटले. पण मुख्यमंत्री या गोष्टीवर शांत का आहेत, असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांनी विचारला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सीमा भागात मराठी जनतेवर कर्नाटककडून होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर बाब आहे. या हल्ल्यामुळे या वादाला वेगळे वळण मिळाले आहे. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली जात आहे. त्यांच्यावर दगडफेकीच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दादागिरी सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करून मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले. पण, मुख्यमंत्री गप्प आहेत. सीमाप्रश्नावर महाराष्ट्राची भूमिका काय आहे? पुढचे धोरण काय? यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी थोरात यांनी केली. (Balasaheb Thorat)

 

मराठी बांधवांवरील अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. महाराष्ट्र कर्नाटकातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे
उभा आहे. सीमाभागात मराठी माणसांवर होत असलेल्या हल्ल्यामागे भारतीय जनता पक्ष आहे.
त्यामागे त्यांचा काय हेतू आहे, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. सीमाप्रश्नावर भाजप राजकारण करत आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने केंद्रातून कर्नाटकला काही सूचना येत आहेत का?
राज्य सरकारने याबाबत स्पष्टता करावी, असेही थोरात म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Balasaheb Thorat | how is the chief minister silent when the marathi brothers are being attacked by karnataka balasaheb thorats question

 

हे देखील वाचा :

Pune Band News | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात पुणे बंदची हाक ! विविध पक्ष व संघटनांतर्फे 13 डिसेंबरला पुणे बंद आंदोलन

Devendra Fadnavis-Amit Shah | शरद पवारांकडून अल्टिमेटम ! फडणवीसांकडून तातडीने गृहमंत्री अमित शहांना फोन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हालचालींना वेग

Pune MNS | …. तर मलाही वसंत मोरेंची गरज नाही; नीलेश माझिरे यांची ‘त्या’ वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया

 

Related Posts