IMPIMP

Balasaheb Thorat | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार?, बाळासाहेब थोरात म्हणाले…

by nagesh
Balasaheb Thorat | Will Uddhav Thackeray participate in Congress' Bharat Jodo Yatra?

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन –काँग्रेसचे Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या चर्चेचा विषय झाली आहे. भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दाखल होणार आहे. 14 दिवस महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा राहणार आहे. महाराष्ट्रात राहूल गांधी यांच्या दोन सभा होणार असून पहिली नांदेड येथे, तर दुसरी शेगांव येथे होणार आहे. भेदभावाचे राजकारण दुर करण्याचा प्रयत्न तसेच बेरोजगारी, महागाई याकडे केंद्र सरकारचे (Central Government) लक्ष वेधण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे. भारत जोडो यात्रेचे निमंत्रण आम्ही शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना दिले आहे, ते 9 तारखेला सामिल होणार आहेत. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील निमंत्रण दिले आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिंदे गटातील काही आमदार (Shinde Group MLA) पुन्हा उद्धव ठाकरे गटात (Thackeray Group) सहभागी होणार असल्याचे बोलले जात असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, या सरकारमध्ये नक्कीच गडबड असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या पद्धतीने सरकार चालत आहे, त्यामुळे शिंदे गटातील लोकांच्या मनात नैराश्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

 

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, राज्य सरकार (State Government) बनले कसं, सरकार झालं कसं, जनसामान्य माणसामध्ये त्यांच्याबद्दल काय मत आहे, हे पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही. आधी तर सरकार बनत असताना मंत्रिमंडळ बनायला तयार नाही, मंत्रिमंडळ (Cabinet) झालं तर मंत्र्यांना खाते मिळत नव्हेत आणि खाते मिळाल्यावर पालकमंत्री यांच्या नियुक्तीला उशीर असं सर्व काही पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या वाऱ्या करता-करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) थकून गेले. त्यामुळे कोण काय बोलतोय, कोण काय करतोय कळतचं नसल्याचा टोला थोरात यांनी लगावला.

 

ओला दुष्काळ (Wet Drought) जाहिर करण्याबाबत सरकारकडे पैसे नसल्याचे बोलले जात आहे,
यावर बोलताना थोरात म्हणाले, मग सरकारकडे पैसा नाही हे एकदा त्यांनी जाहिर केले पाहिजे.
त्यांनी पैसेच नसल्याचं स्पष्ट केले तर लोक देखील म्हणतील जाऊ द्या आता सरकारकडे पैसे नाहीत त्याला
काय ईलाज नाही. सरकार दिवाळखोरीत आहे का? याबाबत त्यांनी सांगावे, जनतेला मदत मिळणे महत्त्वाचे आहे.
आता ती मदत कशी द्यायची याबाबत त्यांनी ठरवावे असेही थोरात म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Balasaheb Thorat | Will Uddhav Thackeray participate in Congress’ Bharat Jodo Yatra?

 

हे देखील वाचा :

Windies Cricket | विंडीज टीमची सध्याची अवस्था पाहून ‘या’ माजी विश्वचषक विजेत्या कर्णधाराच्या डोळ्यात आले पाणी

Pune Crime | गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांकडून अटक, गावठी कट्ट्यासह 2 काडतुसे जप्त

Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…

Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी भाजपचे मिशन 45! शिवसेना-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले निशाण्यावर

 

Related Posts