IMPIMP

Benefits Of Bran Chapati | आतड्यांशी संबंधीत समस्यांमध्ये रामबाण आहे कोंडा युक्त चपाती, जाणून घ्या चमत्कारिक फायदे

by nagesh
Benefits Of Bran Chapati | benefits-of-eating-wheat-bran-flour

नवी दिल्ली : Benefits Of Bran Chapati |अनेकदा महिला चपातीसाठी पीठ मळण्याआधी ते चाळून घेतात, जेणेकरून कोंडा वेगळा करता येईल. नंतर हा कोंडा फेकून दिला जातो. परंतु कोंड्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. तो अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे. कोंडा खाण्याचे चमत्कारिक फायदे जाणून घेऊया (Benefits Of Bran Chapati).

 

कोंडायुक्त पीठ खाण्याचे फायदे 

 

१. इम्युनिटी मजबूत होते

आहारात कोंडा युक्त पिठाचा समावेश केला तर पचनक्रिया चांगली राहते. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत. तसेच इम्युनिटी मजबूत राहते.

 

२. आतड्याच्या समस्या होतात दूर

आहारात कोंडा युक्त पिठाचा समावेश केल्यास जीवनशैलीशी संबंधित समस्या जसे की इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्या टाळता येतात. तसेच कोंडा युक्त पीठ गॅस, पेटके, जळजळ आणि आंबट ढेकर यावर रामबाण उपाय आहे.

 

३. कोलेस्ट्रॉल करा नियंत्रित

कोंडा युक्त पीठाच्या चपाती खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. तसेच नियमित सेवन केल्यास टाईप-२ डायबिटीजपासून संरक्षण होते. कोंड्याचे भजी किवा लाडू देखील खाऊ शकता.

 

पोटाच्या समस्यांवर उपयुक्त

दह्यातून सुद्धा कोंडा खाऊ शकता. पण जास्त सेवन करू नये. जर पोटात गडबड असेल तर याच्या सेवनाने आराम मिळतो.

Web Title : Benefits Of Bran Chapati | benefits-of-eating-wheat-bran-flour

Related Posts