IMPIMP

Bhagat Singh Koshyari | ‘मी जे काही निर्णय घेतले ते…’, न्यायालयाने झापल्यानंतर कोश्यारींची प्रतिक्रिया

by nagesh
Bhagat Singh Koshyari | bhagatsingh koshyari on supreme court verdict floor test uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत.
राज्यातील सत्तासंघर्षावर मोठा निर्णय देताना न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी
घेतलेल्या निर्णयावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्याला धरुन नव्हते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
यावरुन विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली असताना खुद्द भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

न्यायालयाच्या निकालापुढे मी काही बोलणार नाही

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर (Maharashtra Political Crisis) आपण टिप्पणी करु शकत नाही, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. बहुमत चाचणीचा (Majority Test) निर्णय तेव्हा चुकीचा होता. आता त्याच्याशी काय करायचंय? यासंदर्भात न्यायालयानं सगळं सांगितलं आहे. न्यायालयाच्या निकालापुढे मला काहीही बोलायचं नाही, असं कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अॅनालिसिस करणं विधिज्ञांनी काम

घटनेच्या नियमांच्या (Constitution Rules) आधारे तेव्हा मी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते. आज जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे त्यावर अॅनालिसिस करणं हे विधीतज्ज्ञांचे काम आहे, हे माझे काम नाही, असं कोश्यारी म्हणाले.

 

 

मी जे काही निर्णय घेतले ते…

कोश्यारी पुढे म्हणाले, मी राज्यपालपदाहून तीन महिन्यांपूर्वी मुक्त झालो आहे. मी राजकीय मुद्यांपासून स्वत:ला
दूर ठेवत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे, त्यावर विधीतज्ञच प्रतिक्रिया देतील.
मी कायद्याचा अभ्यासक नाही. परंतु घटनेच्या नियमांच्या आधारे तेव्हा मी जे काही निर्णय घेतले ते विचारपूर्वक घेतले होते. जर त्यावेळेस माझ्याकडे कोणाचा राजीनामा आला, तर मी काय म्हणायचं की राजीनामा देऊ नये.

 

 

Web Title :- Bhagat Singh Koshyari | bhagatsingh koshyari on supreme court verdict floor test uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना न्यायालयाने कालबाह्य केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; नाशिक जिमखाना संघाचा दुहेरी विजय !!

Devendra Fadnavis | ‘…तेव्हा नैतिकता कुठे गेली होती’; राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

BARTI Pune | बार्टी संस्था ‘आयएसओ’ ने सन्मानित

Ganesh Nanasaheb Gaikwad | नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड याची अमरावती कारागृहात रवानगी

 

Related Posts