IMPIMP

Chandrakant Khaire | ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांच्या पायाची धूळदेखील नाहीत’ – चंद्रकांत खैरे

by nagesh
Chandrakant Khaire | 'Chief Minister Eknath Shinde is not even the dust of Shivaji Maharaj's legs' - Chandrakant Khaire

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – प्रतापगडावर झालेल्या शिवप्रताप दिनाच्या सोहळ्याला महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराज व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना केली होती. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून सुटका केली होती, त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून सुटका करून घेतली, असे लोढा म्हणाले होते. त्यावरून त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांच्या पायाची धूळदेखील नाहीत, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लोढा यांनी महाराष्ट्र राज्यातील राजकीय बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली आहे. त्यामुळे वारंवार महापुरुषांचे अपमान करण्याचे प्रकार सध्या राज्यात सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे कोण आहेत? छत्रपती शिवरायांच्या पायाची धूळसुद्धा नाहीत. या सांस्कृतिक मंत्र्याला मी सांगू इच्छितो की, यांना महाराष्ट्रातील मराठी संस्कृती माहिती नाही. ते बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) आहेत. यांनी काहीतरी मिळावे म्हणून असे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत.
त्यामुळे गोड गोड बोलून मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी आणि त्यांची स्तुती करण्यासाठी जर
हे असे शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असतील, तर योग्य नाही.
आम्ही त्यांचा आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.

 

मी मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा शिवाजी महाराजांवर
वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्ये केल्याने तीव्र निषेध व्यक्त करतो, असे यावेळी खैरे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Khaire | ‘Chief Minister Eknath Shinde is not even the dust of Shivaji Maharaj’s legs’ – Chandrakant Khaire

 

हे देखील वाचा :

UdayanRaje Bhosale | ‘कोणी मला फोन केला नाही, कार्यक्रम आज असल्याचे …’; शिवप्रतापदिनी अनुपस्थितीवर उदयनराजे भोसले यांचे स्पष्टीकरण

Udayanraje Bhosale | ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका’ – उदयनराजे भोसले

Shraddha Walkar Murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताबच्या नव्या प्रेयसीची ‘एन्ट्री’

Pune Crime | मित्रांच्या पार्टीत नशेत असलेल्या कॉलेज तरुणीवर बलात्कार, वारजे परिसरातील धक्कादायक घटना

 

Related Posts