IMPIMP

UdayanRaje Bhosale | ‘कोणी मला फोन केला नाही, कार्यक्रम आज असल्याचे …’; शिवप्रतापदिनी अनुपस्थितीवर उदयनराजे भोसले यांचे स्पष्टीकरण

by nagesh
UdayanRaje Bhosale | no one received a call for the program at pratapgarh udayanraje bhosale clearly stated

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन   महाराष्ट्र सरकारने मोठ्या दिमाखात शिवप्रताप दिन आज (३० नोव्हेंबर) प्रतापगडावर साजरा केला. मुळात १० नोव्हेंबर रोजी साजरा होणारा शिवप्रताप दिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ३० नोव्हेंबरला साजरा झाला. पण या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) उपस्थित नव्हते. राज्यपाल महोदयांनी केलेल्या शिवाजी महाराजांवरच्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, असा अंदाज सर्वांनी लावला होता. पण उदयनराजेंनी त्यांच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट केले आहे.

 

“या कार्यक्रमासाठी कोणी मला फोन केला नाही, कार्यक्रम आज असल्याचे मला सकाळी पत्रिका पाहिल्यावर कळलं. मला कुणीच कार्यक्रमाला बोलावलं नव्हतं”, असे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले. पुढे त्यांनी अनेक विषयांवर त्यांचे मत मांडले. शिवप्रताप दिन १० नोव्हेंबरला असताना तो ३० नोव्हेंबरला साजरा केला जातोय, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाजी महाराजांच्या जयंतीप्रमाणे एकप्रकारे इथेही घोळ घालणार का, असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, “शिवजयंती ३ दिवस साजरी करतात. ही एकप्रकारे अवहेलना नाही का? परदेशातील लोक विचारतात खरी शिवजयंती कुठली?” तसेच मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराज आणि एकनाथ शिंदे यांची केलेली कथित तुलना यावरही त्यांचे विचार मांडले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांना पकडून नेले नव्हते स्वत: गेले होते. माफीनामा अजिबात लिहिला नाही. घातपात होऊ शकतो माहीत असताना ते दिल्लीला गेले होते. त्याला शूरता म्हणतात.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानंतर त्यांनी संपूर्ण देशात चाललेल्या राजकारणाची टीका केली.
‘प्रत्येक राजकीय पक्ष फक्त मतांसाठी शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शिवाजी महाराजांमुळे भारतात लोकशाही आहे,
सर्व पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना राष्ट्रद्रोहाची शिक्षा द्यायला हवी,’ अशी मागणीही त्यांनी केली.

 

Web Title :- UdayanRaje Bhosale | no one received a call for the program at pratapgarh udayanraje bhosale clearly stated

 

हे देखील वाचा :

Udayanraje Bhosale | ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नका’ – उदयनराजे भोसले

Shraddha Walkar Murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताबच्या नव्या प्रेयसीची ‘एन्ट्री’

Aditya Thackeray | ‘हे सर्व म्हणजे महाराष्ट्राचे खच्चीकरण आणि आर्थिक अलगीकरण करण्याचा प्रयत्न’ – आदित्य ठाकरे

Pune PMC News | येरवडा मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हलविणार

 

Related Posts