IMPIMP

Chitra Wagh | ‘मुख्यमंत्री महोदय हीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका’, चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

by nagesh
Chitra Wagh | BJP leader chitra waghs criticism of raghunath kuchik and ask where is victim

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर (Shiv Sena leader Raghunath Kuchik) बलात्काराचा (Rape) आरोप (Allegations) करणारी पीडित तरुणी बेपत्ता (Victim Missing) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेने आत्महत्या करत (Committing Suicide) असल्याची पोस्ट लिहिल्यानंतर गायब झाल्याचे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटले आहे. यावरुन चित्रा वाघ (Chitra Wagh ) यांनी रघुनाथ कुचिकवर हल्लाबोल केला आहे. कुचिकवर 307 चा गुन्हा (FIR) दाखल करुन पीडितेला आधी शोधा. तिच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास सरकार आणि पोलीस जबाबदार असतील असं चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुण्यातील शिवसेना नेता रघुनाथ कुचिकवर एका तरुणीने बलात्कार करुन गर्भपात (Abortion) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुणीने काल फेसबुक पोस्ट (Facebook Post) करत कुचिकच्या त्रासाला कंटाळून, आता माझ्यात जिवंत राहण्याची क्षमता नाही, असे म्हटले होते. ती तरुणी आता गायब झाल्याची माहिती मिळत आहे. यावर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh ) यांनी ट्विट करत टीका केली आहे. ती तरुणी आता गायब आहे. तिला वाचवा असे त्यांनी म्हटले आहे. तसेच तिचे बरे वाईट झाल्यास राज्य सरकार (State Government) त्याला जबाबदार (Responsible) असेल असेही वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

कुठे गेलीय ती मुलगी कि यानेच तिला गायब केली ?
चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एक फोटो पोस्ट करुन हाच तो बलात्कारी शिवसेना पुण्याचा नेता रघुनाथ कुचिक… ज्याने एका मुलीवर बलात्कार केला व जबरदस्तीने गर्भपात ही करवला. न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करत स्वत:ला संपवते म्हणत तीने काल FB पोस्ट केली. अजूनही त्या मुलीचा तपास लागला नाही… ती गायब आहे. कुठे गेलीय ती मुलगी कि यानेच तिला गायब केली याचा ही तपास करा. हीची पूजा चव्हाण (Pooja Chavan) होऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदय. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कुचिकवर तात्काळ 307 चा गुन्हा दाखल करा. तिच्या मरणाची वाट बघू नका त्याआधी तिला वाचवा. असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र सीएमओ (Maharashtra CMO), महाराष्ट्र गृह विभाग (Maharashtra Home Department), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांना टॅग (Tag) केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीडित तरुणीची पोस्ट
काल मी स्वत:चा जीव द्यायच्या विचारात चालले होते. त्यातून पोलिसांनी मला समजावून सांगून माझी मनस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मी माझी समजूत घ्यायची मानसिकता नसताना देखील त्यांचा आदर ठेवत ते ऐकले. आणि माझ्या वडिलांसोबत घरी सुद्घा गेले. पण आज परत रघुनाथ कुचिक यांनी मला व्हॉट्सअ‍ॅपवर हिणवत मेसेज केले… मी काल जे काही करत होते त्यासाठी मला नको नको ते बोलले… किती काळ मी सतत त्रास सहन करायचा… सतत त्यांची लोक मित्र मला मसेज करुन त्रास देतात खूप कंटाळले आहे मी या सगळ्याला. काल मी जे करणार होते तेच योग्य होत आता माझ्यात जिवंत राहण्याची क्षमता नाही आणि सहनशक्ती तर त्याहून नाही आणि त्याही व्यक्तीला मी मेलेलीच हवीय… माझ्या मरणाने हे सगळं थांबणार असेल आणि त्यांचा जीव ते केल्याने भरणार आहे… असही माझ्या आयुष्याची राख रांगोळी करुन सगळंच संपवले आहे आता मी मरण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होईल त्यांची.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

काय आहे प्रकरण
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
एका 24 वर्षाच्या तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
रघुनाथ कुचिक यांनी या तरुणीला विवाहाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
यातून ती तरुणी गर्भवती राहिली. मात्र, कुचिक याने तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले असा आरोप करण्यात आला आहे.
गर्भपात न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | BJP leader chitra waghs criticism of raghunath kuchik and ask where is victim

 

हे देखील वाचा :

Shamita Shetty And Raquesh Bapat Breakup | अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांचे ब्रेकअप झाले का?, दोघांनी केला खुलासा

Benefits Of Strawberry | स्ट्रॉबेरी खाल्ल्याने आरोग्यास होतात ‘हे’ गुणकारी फायदे

Pimpri Corona Update | मोठा दिलासा ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’ची एक अंकी रुग्णसंख्या, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts