IMPIMP

Chitra Wagh | ‘वाह रे बहाद्दरांनो…, सभेत दगडं मारतां..?’ चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे कोल्हापुरात खळबळ

by nagesh
 Chitra Wagh | bhim army threatened to throw ink on chitra wagh face

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Chitra Wagh | उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीची (Kolhapur Assembly By – Election) रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) आमने सामने आहेत. पण प्रचारावेळी अनेक राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या कोल्हापुरातील (Kolhapur News) प्रचार सभेमध्ये दगडफेक केल्याचा खळबळजनक आरोप केला. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्यांची मुक्तसैनिक वसाहत या ठिकाणी रात्री सभा पार पडली. सभा सुरू असताना एका बाजूने व्यासपीठाच्या दिशेने दगडे फिरकावण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. याबाबत माहिती चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, ”वा रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही म्हणून सभेत दगडे मारता का ?” असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला. तसेच, ”तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांना दाखवा असल्या थेऱ्यांना घाबरणारी चित्रा वाघ नाही” असा जोरदार इशारा त्यांनी दिला आहे.

 

 

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेक करण्यात आली, याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
मात्र, चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे कोल्हापूर शहरात मात्र खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | stone throwing in sabha allegations by chitra wagh in kolhapur by election

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला; म्हणाले – ‘जरा शहाण्या माणसांबद्दल बोललेलं बरं..’

Sanjay Raut | ‘शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींसमोर सक्षम पर्याय निर्माण होऊ शकत नाही’ – संजय राऊत

Pune Crime | पुण्यात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट जिन्स पँटची विक्री, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts