IMPIMP

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)

by nagesh
CM Eknath Shinde | eknath shindes strong response to uddhav thackerays criticism on narendra modi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – पोचोऱ्यात रविवारी झालेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) एकेरी उल्लेख केला. ते म्हणाले, तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? या टीकेनंतर भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून (Shinde Group) उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते वक्तव्य दुर्दैवी असून त्याचा निषेध करावा तितका कमी असल्याचे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं नेतृत्व संपूर्ण जगात सिद्ध केलं आहे. आपली अर्थव्यवस्था (Economy) मोठ्या उंचीवर नेली आहे. त्यामुळेच आपल्याला जी 20 (G20) परिषदेचं अध्यक्षपद मिळालं, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला याचा निषेध करावा तितका कमी आहे. पंतप्रधानांच्या मातोश्रीचं निधन झालं तेव्हा देखील त्यांनी देशाला प्राधान्य दिलं. त्यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध केली.

 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे वैयक्तिक द्वेशातून आलं आहे. लोकप्रियतेची पोटदुखी निर्माण झाल्यावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं पाप काही लोक करतात. 25 वर्ष त्यांनी युतीत काम केलं. आता त्याच भाजपा नेत्याबद्दल असं वक्तव्य हे निंदाजनक आहे. त्यांचं वक्तव्य हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची संस्कृती होऊ शकत नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी ते काय करु शकतात हे आधीच त्यांनी दाखवलं आहे, त्याची पुनरावृत्ती ते करत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shindes strong response to uddhav thackerays criticism on narendra modi

 

हे देखील वाचा :

Raghvendra Bapu Mankar Medical Foundation | गिरीश बापट आणि संदीप आठवले यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण; राघवेंद्र बापू मानकर मेडिकल फाउंडेशनचा उपक्रम

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंकडून मोदींचा एकेरी उल्लेख, बावनकुळे संतापले, म्हणाले- ‘बोलताना जरा तारतम्य बाळगा’ (व्हिडिओ)

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

Ajit Pawar | ‘मविआत शक्य नाही, अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमच्यासोबत यावे’, केंद्रीय मंत्र्याची ऑफर

 

Related Posts