IMPIMP

CM Eknath Shinde | ‘…पण उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा

by nagesh
CM Eknath Shinde | shivsena saamana editorial chhatrapati sambhaji maharaj statement abou ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन राज्यात भाजप-शिवसेना युती (BJP-Shivsena Alliance) तुटल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस
(Congress) या तीन पक्षांनी महाविकास आघाडी करुन सरकार स्थापन केलं. त्यानंतर अनेक प्रयत्न केल्यानंतर शिंदे गट (Shinde Group) फुटला
आणि राज्यात भाजपला सत्ता मिळवता आली. परंतु महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यावर उद्धव
ठाकरेंना (Uddhav Thackeray) भाजपसोबत युती करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी आमचं ऐकलं नाही, असा खुलासा मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा खुलासा केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, भाजप हा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र होता. परंतु 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आमचं ऐकलं नाही.

 

मविआ सरकारला आमदारांचा विरोध होता
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, राज्यात शिंदे-भाजप सरकार (Shinde-BJP Government) कसे स्थापन झाले हे राज्यातील प्रत्येकाला माहित आहे. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत सत्ता स्थापन केली नाही. 2019 च्या विधानसभेत भाजप-शिवसेना युतीने एकत्र निवडणूक लढवली होती.
त्यानंतर आलेल्या निकालात युती सरकारच्या बाजूने जनादेश होता. पण, उद्धव ठाकरे यांनी मनाविरुद्ध 2019 मद्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.
याला शिवसेनेतील आमदारांचा (Shivsena MLA) विरोध होता, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

सत्तेत असूनही सेनेच्या आमदारांना न्याय मिळत नव्हता
निवडून येणाऱ्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघाचा कायापालट व्हावा असे वाटते.
गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. सत्तेत असूनही आमदार आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नव्हता.
यामुळे आमच्यातील अनेकांनी उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करावी,यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला.
पण, आम्ही त्यात यशस्वी झालो नाही, अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | i tried to convince uddhav thackeray to go with bjp say maharashtra cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Pratap Sarnaik | ‘केले ‘प्रताप’ मविआ सरकार पाडण्याला, सरनाईक विचारती भाजपला…’, सचिन सावंत यांचा सरनाईकांना टोला

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडेल’, जयंत पाटील यांचे सूचक भाकित; अजित पवार म्हणाले…

Pune Crime | मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी घेतलेल्या पैशांच्या दामदुप्पट वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी देणार्‍या सावकाराला अटक; दरमहा ३० टक्के व्याज करीत होता वसुल

 

Related Posts