IMPIMP

CM Eknath Shinde | “जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय”, असा फोन आल्यास सावधान राहण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray slams cm group over incidence in pune where eknath shinde supporters mistakenly tried to hit veer savarkar photo instead of rahul gandhi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या गटाची म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाची सदस्य संख्या वाढविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरु केली आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आवाजाची स्वयंचलीत फीत फोन करुन ऐकविली जाते आणि त्यावर सदस्य नोंदणी केली जाते. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray Group) संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे फोन न घेण्याचे आवाहन सामना वृत्तपत्रातून केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ शिंदे यांच्या कॉलिंग यंत्रेणेद्वारे फोन केला जातो आणि आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सदस्य व्हा, असे सांगण्यात येते. “जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतो आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी मी एक भक्कम पाऊल उचलले आहे. सुजलाम, सुफलाम महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही देखील आमच्यासोबत सामील व्हा. सामील होण्यासाठी क्रमांक १ दाबा” अशा प्रकारचे फोन सध्या नागरिकांना येत आहेत.

 

त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने संताप व्य्कत करत अशा फोनला उत्तरे न देण्याचे आवाहन केले जात आहे.
शिवसेना पक्षासोबत गद्दारी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून लोकांना व्हॉईस कॉल करुन फसवणूक करण्यात येत आहे.
त्यांनी बेकायदा सरकार स्थापन केले आहे आणि आता ते संपर्क करुन आपले सदस्य वाढविण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यांनी कॉल केल्यावर ते 1 क्रमांक दाबायला सांगत आहेत.
तुम्ही असे केल्यास मिंधे गटाला तुमचे समर्थन जाणार आहे.
अशाच प्रकारची यंत्रणा वापरुन भाजप (BJP) हा देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला होता.
त्यामुळे राज्यभरातील शिवसेना Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे – Uddhav Balasaheb Thackeray)
पक्षाच्या समर्थकांना सूचित करण्यात येते की, वरील मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवा आणि व्हॉईस कॉलला कोणताही
प्रतिसाद देऊ नका, अशी सूचना सामनाच्या मुखपत्राच्या माध्यमातून दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | uddhav thackeray is aggressive after cm eknath shinde started making phone calls to register the members of balasahebanchi shivsena

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | भाजपा खासदाराचा शिवसेनेला टोला, म्हणाले – ‘मुख्यमंत्री पद गेल्यानंतर महाराष्ट्राची…’

Naresh Mhaske | ‘ठाकरेंकडे जेव्हा सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काही केले नाही’ – नरेश मस्के

Chandrakant Patil | ‘मातोश्रीवर बसून लोकांची दु:खे कळत नाहीत’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts