IMPIMP

CM Uddhav Thackeray | नवीन वर्षात नवं संकट ! कोरोनाची तिसरी लाट? – CM उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश

by nagesh
Coronavirus In Maharashtra | mask compulsory again in maharashtra likely to be decided soon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Uddhav Thackeray | कोरोना (Corona virus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Covid Variant) विषाणूने महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. सध्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यातच यंदा नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्याच्या मध्यात कोरोनाच्या अँक्टिव्ह रुग्णांत (Active patient) वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या महाराष्ट्रात दहा हजार रुग्ण आहेत. अशी हळूहळू वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या राज्य मंत्रिमंडळ (State Cabinet) बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्व पालकमंत्र्यांना लसीकरणासाठी (Vaccination) निर्देश दिले आहेत.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आज (सोमवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी निर्देश दिले आहेत. या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यानूसार कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर टास्क फोर्सची (Task Force) बैठकही येत्या 1 ते 2 दिवसांत आयोजित करावी असं देखील त्यांनी निर्देश दिले आहेत.

दरम्यान, 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण (Active patient) आहेत.
एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील 6 दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास (Additional Chief Secretary Dr. Pradeep Vyas) यांनी दिली.
तसेच, राज्यात पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.06 टक्के झाल्याचं देखील डॉ व्यास यांनी सांगितलं.
तसेच, व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली
असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | new crisis in the new year corona to grow in january instructions given by the cm uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Ramdas Athawale | ‘उद्धव ठाकरेंना बरं होण्यास 2-3 महिने लागतील, मुख्यमंत्र्याचा पदभार देवेंद्र फडणवीसांना द्यावा’ – रामदास आठवले

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 80 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात बॉलपेनवरुन घरफोडीचा गुन्हा उघड, विमानतळ पोलिसांकडून 29 लाखांचा मुद्देमाल जप्त; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts