IMPIMP

CM Yogi Adityanath | योगी आदित्यनाथ यांचा डबल धमाका ! आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री करु शकला नाही हा ‘विक्रम’

by nagesh
CM Yogi Adityanath | up assembly election result 2022 cm yogi adityanath big record

लखनऊ : वृत्तसंस्था CM Yogi Adityanath | उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा जागांवर मतमोजणी (UP Election 2022) सुरु असून भाजपला बहुमत (BJP Majority) मिळाले आहे. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) पुन्हा सरकार बनवताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहास रचणार असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद (Record) होणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री
उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे पहायला मिळत आहे. यूपीमध्ये सरकार (UP Government) स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री बनतील. जे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेवर येतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात आजवर असे घडले नाही. उत्तर प्रदेशमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत, मात्र त्यापैकी एकानेही पहिल्या 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामध्ये संपूर्णानंद (Sampurnanand), चंद्र भानु गुप्ता (Chandra Bhanu Gupta) आणि हेमवती नंदन बहुगुणा (Hemwati Nandan Bahuguna) यांच्या नावाचा समावेश आहे. (CM Yogi Adityanath)

 

कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेत
2017 मध्ये योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाची सत्ता यूपीमध्ये स्थापन करणार आहेत.

 

मुलायम सिंह यांच्यानंतर आमदार झाल्यानंतरही राहतील मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. ते गोरखपूरमधून (Gorakhpur) निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 2003 नंतर पहिल्यांदाच आमदार (MLA) झाल्यानंतर मुख्यमंत्री होणार आहे. यापूर्वी 2003 मध्ये मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री बनले होते. यानंतर मायावती (Mayawati), अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि योगी आदित्यनाथ स्वत:विधान परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची पर्यंत पोहोचले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- CM Yogi Adityanath | up assembly election result 2022 cm yogi adityanath big record

 

हे देखील वाचा :

Hrithik Roshan – Saba Azad Marriage News | हृतिक रोशन आणि सबा लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? जवळच्या मित्रानं केला मोठा खुलासा

Global Center For Traditional Medicine Jamnagar | भारतातील या शहरात लवकरच साकारणार आयुर्वेदाचे WHO ग्लोबल सेंटर, कॅबिनेटकडून मिळाला हिरवा झेंडा

Tata Motors | रेकॉर्ड हायपासून 25% घसरून सावरला राकेश झुनझुनवाला यांचा स्टॉक, पुढे जोरदार तेजीचा अंदाज

 

Related Posts