IMPIMP

Congress Member in Rajya Sabha | काँग्रेसची अवस्था आणखी बिकट ! राज्यसभेतील सदस्य संख्याही होणार कमी

by nagesh
MVA Vajramuth Sabha | mahavikas aghadi vajramuth sabha nagpur problems in congress as nitin raut unhappy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Congress Member in Rajya Sabha | काँग्रेस पक्षाची (Congress) अवस्था दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. 2014 पासून ते आजपर्यंत काँग्रेसला उभारी घेता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची पीछेहाट झाली असून पंजाबमध्ये (Punjab) सत्ता गमवावी लागली आहे. दरम्यान, या सर्वांचा फटका राज्यसभेतही काँग्रेसला बसणार आहे. कारण राज्यांमधील आमदारांच्या (MLA) संख्येवरून राज्यसभेतील खासदारांचं (MP) प्रमाण ठरतं त्यामुळे काँग्रेसची राज्यसभेतील सदस्य (Congress Member in Rajya Sabha) संख्याही कमी होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2014 पासून काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. अनेक उपाययोजना करूनही काँग्रेसला उभारी घेता येईना. अलीकडील देशातील अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन अंकी आकडा गाठता आला नाही. दिवसेंदिवस काँग्रेसची कामगिरी खराब होत आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यांमधील आमदारांच्या संख्येवरून राज्यसभेतील खासदारांचं प्रमाण ठरतं. त्यामुळे 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून काँग्रेसचा एकही सदस्य राज्यसभेवर राहणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यसभेत मार्चमध्ये कॉंग्रेसचे 33 खासदार होते. आता ए. के. अँटनी (A. K. Antony) यांच्यासह 4 सदस्य निवृत्त झाले आहेत. तर जून आणि जुलैमध्ये आणखी 9 सदस्यांचा कार्यकाळ संपेल. यामध्ये पी. चिदंबरम (P. Chidambaram), अंबिका सोनी (Ambika Soni), जयराम रमेश (Jairam Ramesh) आणि कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या नावांचा समावेश आहे. (Congress Member in Rajya Sabha)

 

जाणकारांच्या मते निवडणुकीनंतर राज्यसभेत काँग्रेसची सदस्य संख्या 30 असेल. आतापर्यंतच्या इतिहासात इतकी सदस्य संख्या कधीच नव्हती. दरम्यान, द्रमुक तामिळनाडूतील 6 पैकी एक जागा आपल्याला सोडेल असा विश्वास काँग्रेसला आहे. तस झालं तर राज्यसभेत काँग्रेसची सदस्य संख्या 31 होईल. असे असले तरी उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, दिल्ली आणि गोव्यातून काँग्रेसचा एकही सदस्य नसेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

17 राज्यांमध्ये काँग्रेसचे नुकसान –
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची 17 राज्यांमधून पिछेहाट होणार आहे.
यात हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गोवा, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, आसाम, मेघालय,
अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

 

Web Title :- Congress Member in Rajya Sabha | rajya sabha congress is in deep trouble after election there will be no party mp from these states

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांचे जोरदार टीकास्त्र; म्हणाले – ‘राज ठाकरेंचा हा सगळा सिझनेबल कार्यक्रम’

Acid Reflux | जेवल्यानंतर छातीत जळजळ होते का? अ‍ॅसिड रिफ्लक्समध्ये ‘या’ 10 पद्धती देतील आराम; जाणून घ्या

RRR OTT Release Date | ‘या’ दिवशी ओटीटीवर रिलिज होणार राजामौलीचा ’आरआरआर’, लक्षात ठेवा तारीख

 

Related Posts