IMPIMP

Coronavirus Cases Today In India | देशात अनियंत्रित कोरोना केसमध्ये 56% प्रचंड वाढ, गेल्या 24 तासात 90928 केस; ओमिक्रॉनचा आकडा 2630

by nagesh
Coronavirus Cases Today In India | coronavirus cases today india reports 90928 fresh covid cases and 325 deaths in the last 24 hours

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – Coronavirus Cases Today In India | देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Corona virus) महामारीचा वेग अनियंत्रित होत आहे. सोबतच कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) ची प्रकरणे सुद्धा वेगाने वाढत आहेत. देशात मागील 24 तासात कोरोना व्हायरसच्या 90 हजार 928 नवीन केस समोर आल्या आहेत. तर, 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची 2630 प्रकरणे समोर आली आहेत. आज देशात कोरोनाची ताजी स्थिती काय आहे जाणून घेवूयात. (Coronavirus Cases Today In India)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आतापर्यंत 4 लाख 82 हजार 876 जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशात आता अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या वाढून 2 लाख 85 हजार 401 झाली आहे. तर, या महामारीने जीव गमावणार्‍यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 876 झाली आहे. आकड्यांनुसार, काल 19 हजार 206 लोक बरे झाले, ज्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 411 हजार 9 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

 

 

आतापर्यंत 148 कोटीपेक्षा जास्त डोस दिले

 

राष्ट्रव्यापी लसीकरण उपक्रमात आतापर्यंत कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीचे 148 कोटीपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. काल 91 लाख 25 हजार 99
डोस दिले गेले, ज्यानंतर आतापर्यंत व्हॅक्सीनचे 148 कोटी 67 लाख 80 हजार 227 डोस दिले गेले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देशात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 2630 केस

 

देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटने 2630 लोक संक्रमित झाले आहेत. देशात या व्हेरिएंटने संक्रमित राज्यांची संख्या 26 झाली आहे. सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीत आहेत. यानंतर तिसर्‍या नंबरवर राजस्थान आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनने 797, दिल्लीत 465 आणि राजस्थानमध्ये 236 लोक संक्रमित झाले आहेत. (Coronavirus Cases Today In India)

 

 

Web Title : Coronavirus Cases Today In India | coronavirus cases today india reports 90928 fresh covid cases and 325 deaths in the last 24 hours

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 26500 पेक्षा अधिक नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | रवींद्र बर्‍हाटेला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक

Maharashtra Rains | महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस कोसळणार? विकेंडला पावसाचा जोर वाढणार – IMD चा इशारा

 

Related Posts