IMPIMP

Cricketer Kedar Jadhav’s Father Missing | क्रिकेटर केदार जाधवचे वडिल पुण्यातून बेपत्ता, पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार

by nagesh
Cricketer Kedar Jadhav's Father Missing | Cricketer Kedar Jadhav's father is missing from Pune, a missing complaint has been lodged at Alankar Police Station, Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Cricketer Kedar Jadhav’s Father Missing | टीम इंडियासाठी खेळणार्‍या क्रिकेटर केदार जाधवचे (Kedar
Jadhav) वडिल महादेव सोपान जाधव Mahadev Sopan Jadhav (75, रा. प्लॅट नं. 002, बी विंग, द पॅलेडियमन, सिटी प्राईडजवळ, कोथरूड) हे
पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात (Alankar Police Station) मिसिंगची
तक्रार (Missing) दाखल आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Cricketer Kedar Jadhav’s Father Missing)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केदार जाधव हे त्यांच्या कुटुंबियासह पुण्यातील कोथरूड परिसरात (Kothrud) रहावयास आहेत. त्याचे वडिल महादेव जाधव यांना डिमेंशिया हा आजार आहे. त्यामुळे त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत. आजारपणामुळे ते नेहमीच घरी असतात. जाधव कुटुंबिय हे त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत. दरम्यान, आज (दि. 27 मार्च) रोजी दुपारी बावणे बारा वाजण्याच्या सुमारास महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते. तेथे काही वेळ चकरा मारल्यानंतर आऊट गेटने ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघुन गेले आहेत. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळुन न आल्याने त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली आहे. (Cricketer Kedar Jadhav’s Father Missing)

महादेव जाधव यांचा रंग-गोरा, केस-पांढरे, उंची-5.6, डाव्या गालावर शस्त्रक्रिया झाल्याने खड्डा पडलेला आहे. महादेव जाधव यांच्या अंगात फुल्ल बाहीचा र्शट व ग्रे कलरची पॅन्ट व पायात काळी चप्पल आणि सॉक्स आहेत. उजव्या हाताचे बोटात दोन सोन्याच्या अंगठया आहेत.

दरम्यान, महादेव जाधव यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास संबंधितांनी अलंकार पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Cricketer Kedar Jadhav’s Father Missing | Cricketer Kedar Jadhav’s father is missing from Pune, a missing complaint has been lodged at Alankar Police Station, Pune

 

हे देखील वाचा :

Radhakrishna Vikhe Patil | उद्धव ठाकरे-भाजप युतीबाबत विखे-पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले – ‘त्यामुळे नवी युती करण्याचा…’

TORK Motors | टॉर्क मोटर्स पुणे डीलरशिपने वितरित केल्या 50 मोटारसायकल्स

Mahindra e-Alfa | 50000 वी इलेक्ट्रिक महिंद्रा ई-अल्फा हरिद्वार येथील कारखान्यातून बाहेर पडली

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी

 

Related Posts