IMPIMP

Vegetarian Protein Food | प्रोटीनसाठी नॉन व्हेज पदार्थांचीच गरज नाही, ‘हे’ व्हेज फूड सुद्धा करतील मदत

by nagesh
Vegetarian Protein Food | you-can-consume-pulses-soybeans-and-milk-for-protein

नवी दिल्ली : Vegetarian Protein Food | शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्यापैकी एक प्रोटीन आहे. शरीराच्या विकासासाठी प्रोटीन अत्यंत आवश्यक असते. (Vegetarian Protein Food)

त्वचा, केस, हाडे आणि स्नायूंसाठी प्रोटीनचे नियमित सेवन आवश्यक आहे. मांस, मासे आणि अंडी हे प्रोटीनचे चांगले स्रोत मानले जातात, परंतु आज आपण प्रोटीनचे व्हेज स्रोतांविषयी जाणून घेवूया (Protein Diet For Vegetarian).

दूध (Milk)

दूध हे सुपर फूड (Super Food) आहे. कारण यात जवळपास सर्व प्रकारची पोषक तत्वे (Nutrients) आढळतात. जर शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर दिवसभरात २ ग्लास दूध प्यावे. यामुळे शरीर मजबूत होईल. शरीरातील प्रोटीनची कमतरताही दूर होईल.

सोयाबीन (Soybean)

शाकाहारी लोक मांस आणि अंडी खाऊ शकत नाहीत, अशा लोकांसाठी सोयाबीन हा उत्तम पर्याय आहे. कारण ते प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे.

डाळ (Pulses)

सर्व प्रकारच्या डाळी (Pulses) प्रोटीनचे पॉवर मानले जाते. कारण डाळ शरीराची पोषकतत्वांची
(Nutrient) गरज पूर्ण करते. पोषकतत्व सर्वात जास्त तुरडाळीमध्ये आढळतात. याशिवाय मसूर डाळ,
राजमा, मूग डाळ आणि चणे यांचा नियमित आहारात समावेश करा.

Web Title : Vegetarian Protein Food | you-can-consume-pulses-soybeans-and-milk-for-protein

Related Posts