IMPIMP

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

by pranjalishirish
deepali chavan anil deshmukh udayanraje bhosale srinivas reddy vinod shivkumar

सातारा : अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण Deepali Chavan  यांनी गुरुवारी सायंकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर मिळालेल्या सुसाईड नोटनंतर आता आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्याच मुद्यावरून सातारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ‘विनोद शिवकुमार यांच्याकडून दीपाली यांना वाईट वागणूक मिळत होती याचे मी वेळप्रसंगी पुरावे देऊ शकतो’, असे म्हटले आहे.

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

दीपाली चव्हाण Deepali Chavan  यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्यावर आता भाटे यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, ‘विनोद शिवकुमार यांच्याकडून दीपाली यांना वाईट वागणूक मिळत होती. मेळघाट व्याघ्रप्रकल्प संचालक श्रीनिवास रेड्डी हे त्यांना पाठिशी घालत आहेत. वेळप्रसंगी याबाबतचे पुरावे मी देऊ शकतो. शासनाने त्या दोघांना तात्काळ निलंबित करावे’.

दरम्यान, दीपाली चव्हाण यांना त्रास देणाऱ्या वरिष्ठांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करणारे निवेदन भाटे यांनी नागपूर येथील वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना दिले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करावी : खा. उदयनराजे

मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण  Deepali Chavan यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करून म्हटले.

Also Read

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts