IMPIMP

Devendra Fadanvis | दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis special cyber prject in the state steps will be taken by the state government to crack down on pornographic disorders

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – Devendra Fadanvis | मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदारांना समजावण्यासाठी शिंदे आणि भाजप सरकारने (Shinde – BJP Government) दुसर्‍या मंत्रीमंडळाचे आश्वासन दिले होते. मात्र, हा विस्तार कधी होणार याबाबत काहीच सांगितले जात नसल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता होती. परंतु आता दुसरा मंत्रिमंडळ विस्तार (Second Cabinet Expansion) दिवाळीनंतर होणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या (Shinde Group) 9 आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागली होती तर भाजपच्या 9 आमदारांना संधी देण्यात आली होती. यामुळे शिंदे गटाचे काही आमदार नाराज झाले होते, काहींनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter Session) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत.

 

19 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे. राज्यमंत्री असतानाही शिंदे गटात सामील झालेले बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांची नाराजीही लपून राहिली नव्हती. तसेच भरत गोगावले (Bharat Gogave), अनिल बाबर (Anil Babar), प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) अशी नावेही चर्चेत होती.

 

शिंदे गट आणि भाजपाकडे समान मंत्रीपदे असल्याने दुसर्‍या मंत्रीमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांच्या गटातील कोणत्या व किती आमदारांची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे आहे.
कारण यानंतर अनेक गोष्टी घडू शकतात. एकनाथ शिंदे यांना तर तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
शिंदे गटाचे अनेक आमदार इच्छुक असल्याने कोणाकोणाचे समाधान करायचे, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फडणवीस यांनी रविवारी नागपूर येथे बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्ट सांगितल्याने यावर लवकरच
निर्णय होण्याची शक्यता आहे. फडणवीस म्हणाले, कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे नागपुरात हिवाळी
अधिवेशन होऊ शकले नव्हते. यंदा डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये दोन आठवड्यांचे अधिवेशन होईल.
राज्य सरकारची (State Government) तर तीन आठवडेदेखील अधिवेशन चालविण्याची तयारी आहे.
या अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

 

 

Web Title :- Devendra Fadanvis | devendra fadanvis comment on cabinet expansion over second time

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खुन, गोवंडी परिसरातील धक्कादायक घटना

Pune Crime | एसटी प्रवासात कुरिअर बॉयचे 24 लाख लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

Devendra Fadnavis | ‘…तेव्हाच मला राग येतो’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं

 

Related Posts