IMPIMP

Devendra fadanvis | ‘ते काम कोणता एक पक्ष करू शकत नाही’, राऊतांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

by nagesh
 Devendra fadanvis | devendra fadnavis bjp mocks sanjay raut shivsena uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   तब्बल १०२ दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विधाने केली आहेत. पण आज सकाळी प्रसारमाध्यमांशी (Press Conference) बोलताना राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कामाचे कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. “फडणवीसांनी गेल्या तीन महिन्यांत काही चांगले निर्णय़ घेतले. महाराष्ट्रात निर्माण झालेली कटुता संपवण्यासंदर्भात त्यांनी केलेल्या आवाहनाचं मी स्वागत करतो”, असंही संजय राऊत म्हणाले होते. या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

संजय राऊतांनी कटुतेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. तसेच, अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनाही (Uddhav thackeray) लक्ष्य केले. “मला जर राऊतांनी भेटीसाठी वेळ मागितला तर मी देईन. मी सगळ्यांनाच भेटतो. पण राजकारणातली कटुता दूर करायची असेल, तर सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. कोणताही एक पक्ष हे काम करू शकत नाही. नेत्यांनी स्वतः शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं, ही पद्धतही बंद करावी लागेल”.

 

देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या जामिनावरही भूमिका मांडली. “कोर्टानं एक निर्णय दिला आहे.
तो निर्णय योग्य की अयोग्य यावर ईडी (ED) बोलू शकेल. ते उच्च न्यायालयात गेले आहेत.
आता त्यावर काही बोलणं योग्य होणार नाही. उच्च न्यायालयातल्या सुनावणीनंतर आपण त्यावर बोलू”, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra fadanvis | devendra fadnavis bjp mocks sanjay raut shivsena uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Sharad Ponkshe | ‘हर हर महादेव’च्या समर्थनात शरद पोंक्षे म्हणले, ‘तुम्ही गुंड आहात का? हा शुद्ध हलकटपणा…’

MNS | कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता …,मनसेचा संजय राऊतांना खोचक टोला

Maharashtra Politics | आदित्य ठाकरे भारत जोडोत जाणार म्हणजे बुडत्याला गांधींचा आधार – भाजप

 

Related Posts