IMPIMP

T20 World Cup 2022 | सूर्यकुमारने गंभीर-युवराजच्या यादीत मिळवले स्थान; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला 6 वा भारतीय

by nagesh
T20 World Cup 2022 | ind vs sa suryakumar yadav back to back half- century for india t20 world cup 2022

सरकारसत्ता ऑनलाईन  –  T20 World Cup 2022 | भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) काल पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) शानदार फलंदाजी केली. या सामन्यात त्याने 68 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 100 चा आकडा पार करता आला. पर्थमध्ये (Perth) अर्धशतक झळकावून सूर्याने गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांच्याशी संबंधित विशेष यादीत स्थान मिळवले आहे. टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) सलग दोन अर्धशतके झळकावणारा सूर्यकुमार हा भारताचा 6 वा फलंदाज ठरला आहे. याआधी त्याने नेदरलँड विरुद्ध नाबाद 51 धावांची खेळी केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थमध्ये झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने 40 चेंडूत 68 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. या टी-20 विश्वचषकातील त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. या अगोदर अशी कामगिरी विराट कोहली आणि गौतम गंभीरसारख्या खेळाडूंनी केली आहे. गौतम गंभीरने (Gautam Gambhir) 2007 मध्ये भारतासाठी सलग दोन अर्धशतके झळकावली होती. युवराज सिंगने (Yuvraj Singh) 2007 च्या टी-20 विश्वचषकात हि कामगिरी केली होती. त्यानंतर 2014 मध्ये कोहली आणि रोहितने (Rohit Sharma) हि कामगिरी केली होती. तसेच विराट कोहलीने (Virat Kohli) 2016 आणि 2022 च्या टी-20 विश्वचषकात सलग दोन अर्धशतके झळकावली होती. यानंतर केएल राहुलने (K.L.Rahul) 2021 मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर आता या यादीमध्ये सूर्यकुमार यादवचा समावेश झाला आहे.

 

टी-20 विश्वचषकात भारतासाठी सलग दोन अर्धशतके करणारे फलंदाज –

2007 मध्ये गौतम गंभीर (51, 58)

2007 मध्ये युवराज सिंग (58, 70)

2014 मध्ये रोहित शर्मा (62, 56).

(Virat Kohli) 2014 मध्ये विराट कोहली (54, 57)

2014 मध्ये विराट कोहली (72, 77)

2016 मध्ये विराट कोहली (82, 89).

2021 मध्ये केएल राहुल (69, 50).

2022 मध्ये विराट कोहली (82, 62)

2022 मध्ये सूर्यकुमार यादव (51, 68)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- T20 World Cup 2022 | ind vs sa suryakumar yadav back to back half- century for india t20 world cup 2022

 

हे देखील वाचा :

Bacchu Kadu Reaction On Ravi Rana | मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करूनही बच्चू कडू – रवी राणांमधील वाद मिटला नाही?

Raj Thackeray | पंतप्रधान देशाचे हवेत, राज्याचे नकोत – राज ठाकरे

Sharad Pawar | शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड, ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल

 

Related Posts