IMPIMP

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांकडे टोमणे बॉम्ब नावाचं शस्त्र’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Governor Appointed MLA | kolhapur shivsena city chief sunil modi plea set back for bjp in legislative council speaker election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टोला लगावला आहे. ‘युक्रेन – रशियात युद्ध सुरू आहे. त्यासाठी युक्रेनच्या अध्यक्षांनी आमच्या मुख्यमंत्र्यांकडून सल्ला घ्यावा. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वात मोठं शस्त्र आहे, ते म्हणजे टोमणे बॉम्ब शस्त्र आहे,’ असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”मुख्यमंत्री नवाब मलिकांचं (Nawab Malik) समर्थन कसं काय करू शकतात. मेहबुबा मुफ्तीसोबत (Mehbooba Mufti) तुम्ही गेला असं मुख्यमंत्री म्हणाले. अशा प्रकारच्या आरोपींना फाशी देऊ नये, असे म्हणणारे तुमच्यासोबत बसले होते. मुफ्तींच्या संदर्भात आएसआयने सांगितली, की काश्मीरमध्ये निवडणूक होऊ देणार नाही. त्यावेळी देशाची गरज होती, म्हणून आम्ही मुफ्तीसोबत सरकार बनवले.” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

 

पुढे फडणवीस म्हणाले, ”मोदींसोबत तुम्ही मतं मागितली. पण, सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागलात. कोण शीखंडी आहे ? शीखंडीला पुढे करणारी ही औलाद नाहीये. समोर लढणारी लोक आहोत. कपटांनी राज्य कौरवांनी घेतलं होतं. पांडवांनी घेतलं होतं. पण पांडव घाबरले नव्हते. आम्ही घाबरत नाही. आम्ही मांडलेल्या गोष्टी पुराव्यानिशी मांडल्या. त्याला उत्तरं मिळालीच नाही. विधानसभेत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. भाषण विधानसभेतलं होतं, पण ते शिवाजी पार्कवरील झालं.” असा टोलाही त्यांनी लगावला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, ”आम्ही जगाला दाखवून दिलं की इथं निवडणूक होऊ शकते. दुसऱ्याच क्षणी आम्ही लाथ मारली, तर तुमच्या घरगडी आहेत त्यांना ईडी बोलवत आहे. त्यामुळे ईडी म्हणजे घरडी म्हणता का ? मुंबई पोलिस तुमचे घरगडी आहेत का ? उद्या कोण परवा कोण तुरुंगात जाणार ? हे कोणीची घोषित करू नये. पण, ही अक्कल संजय राऊतांना (Sanjay Raut) देणार आहात का ?,” असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis cirtisise cm uddhav thackeray in his style

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे महापालिकेने थकबाकीदारांचे तब्बल 27 गाळे केले सील; आंबेगाव येथील पुरंदर टेक्नीकल एज्युकेशनचे मैदानही घेतले ताब्यात

MS Dhoni | ‘…म्हणून धोनीने घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय’; CSK च्या सीईओंनी सांगितली अंदर की बात

Nia Sharma Exercise Video | निया शर्माचा Exercise व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा हदरताल, परफेक्ट फिगरसाठी करावं लागतंय ‘हे’ काम..

 

Related Posts