IMPIMP

Devendra Fadnavis | फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा; म्हणाले – ‘राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना?’

by nagesh
Nawab Malik | NCB leader nawab maliks four word tweet serious allegations made bjp leader devendra fadnavis said i am coming

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | आर्यन खान प्रकरणाचं वळण एका वेगळ्या दिशेने जात असल्याचं पाहायला मिळालं. ड्रग्स क्रुझ पार्टी प्रकरणानंतर (Drugs cruise party case) राष्ट्रवादीचे नेते आणि मत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक वेगवेगळे आरोप केल्याने वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस आरोप-प्रत्यारोपाचे झोड उठवताना दिसत आहेत. यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

 

आजही नवाब मलिकांनी समीर वानखेडे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकलाय, असा टोला लगावला होता. त्यांच्या या
विधानावरुन फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पलटवार केला आहे. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? असा चिमटा काढला. तसेच, कोण कोणाचा पोपट आहे, हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, आमच्यासाठी नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पुढे बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, नवाब मलिक दिवसभर काही ना काही बोलत असतात. सध्या त्यांना दुसरं काहीच काम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं म्हणत या प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं आहे.

 

दरम्यान, मलिक यांनी आज एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह भाजपवर देखील टीका केली आहे.
7 डिसेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील, माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल.
पंरतु, आता मी काही बोलणार नाही, मला विषयांतर करायचे नाही. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार, असं मलिक म्हणाले होते.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis reply nawab malik over ncb officer sameer wankhede case

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | नवाब मलिकांचा भाजप नेत्यांना इशारा; म्हणाले – ‘होय, मी भंगारवाला, भंगारांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही’

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना दणका ! हाय कोर्टानं समन्स रद्द करण्यास दिला नकार, केली ‘ही’ सूचना

Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

Related Posts